crime news 1 accused arrested in case of rape of 42-year-old woman Kurlya mumbai esakal
मुंबई

Crime News : कुर्ल्यातील 42 वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणी 1 आरोपी अटकेत

2 फरार आरोपीचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कुर्ल्यातील 42 वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणी एका आरोपींला मंगळवारी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून 2 फरार आरोपीचा शोध सुरू आहे. मोहम्मद याकूब सिद्दिकी उर्फ बबलू असे अटक आरोपीचे नाव असून तो कुर्ल्याचा रहिवाशी आहे. या प्रकरणात फरार आरोपी वसीम आणि मुन्ना यांचा कुर्ला पोलीस शोध घेत आहेत.

बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी मुंबईत कुर्ला परिसरात एका 42 वर्षीय महिलेवर तिच्या घरात तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना कुर्ला परिसरात घडली होती . तीन आरोपींनी महिलेवर बलात्कार करून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले तसेच सिगारेटच्या सहाय्याने तिच्या गुप्तांगावर जखमा केल्याचा महिलेने आरोप केले होते. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी 2 डिसेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करत महिलेचा जबाब नोंदवला. गुन्हा करून आरोपी तीनही आरोपी फरार झाले होतें. महिलेच्या जबाबनुसार पोलिसांनी तिघा आरोपींची ओळख पटवली आणि तपास सुरू केला.

गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली दोन पथक तयार करण्यात आलेले होते. तीन आरोपी पैकी एक आरोपी नामे मोहम्मद याकूब सिद्दिकी उर्फ बबलू, वय-40 वर्षे आरोपी हा कामाठीपुरा, नागपाडा येथे असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली. आरोपीताला पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापडा रचला आणि ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपीची चौकशी सुरू असून इतर दोन आरोपींचा शोध घेण्यास या अटकेमुळे मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

Assembly Elections: उमेदवारी अर्जासाठी 2 दिवस शिल्लक, जाणून घ्या आतापर्यंत महायुती-मविआने किती उमेदवार जाहीर केलेत?

SCROLL FOR NEXT