Fraud esakal
मुंबई

Crime News: ५१ लाख जमा केले मात्र व्यापाऱ्याकडून साखर काही मिळालीच नाही; गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

Crime News: सीबीडीतील एका साखर ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने मुंबईतील एका व्यापाऱ्याची तब्बल २९ लाख ३० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल आहे.

विक्रोळी येथे राहणारे संभाजी पाटील (५४) यांचा मे. अर्जुन एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स या नावाने साखर निर्यातीचा तसेच ॲग्रो प्रॉडक्ट ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. पाटील यांना डिसेंबर २०२२ मध्ये साखरेची आवश्यकता असल्याने त्यांनी सीबीडीतील मे. व्यंकटेश ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपनीकडून १३५ टन साखरेची मागणी केली होती.

तसेच यासाठी नवले यांना ५१ लाख ३० हजार रुपयेदेखील दिले होते. दोन ते तीन दिवसांत साखरेची डिलिव्हरी करण्याचे आश्वासन पाटील यांना देण्यात आले, पण पैसे देऊनही दिरंगाई झाल्याने पाटील यांच्याकडून नरेश नवले यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला जात होता.

सारखेसाठी सतत पाठपुरावा केला; मात्र नरेश नवले याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. अखेर पाटील यांनी नवेलच्या कार्यालयात जाऊन त्याला पैसे परत करण्यास सांगितले; मात्र २२ लाखांचीच रक्कम परत करण्यात आल्याने संभाजी पाटील यांनी अखेर सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT