मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण 67 टक्क्यांनी घटले आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्चमध्ये मुंबईत 1100 गुन्ह्यांची नोंद झाली. मागील वर्षी मार्चमध्ये 3368 गुन्हे नोंदवण्यात आले होते.
नक्की वाचा : आपला एकच हिरो, मुंबई पोलीस!
कोरोनाच्या संकटाचा धसका गुन्हेगारांनीही घेतला आहे. अनेक गुन्हेगारांनी मुंबई सोडली असून, अनेक जण घरातून बाहेर पडत नाहीत. मार्चमधील 1100 प्रकरणांपैकी बहुतेक कलम 188 च्या उल्लंघनाची म्हणजे लॉकडाऊन न पाळल्याची आहेत. 2019 मध्ये एकूण 41 हजार 933 गुन्हे नोंदवण्यात आले, त्यापैकी बहुतेक प्रकरणे चोरीची होती.
नक्की वाचा : भारताने उद्योगासाठी चीनला पर्याय व्हावे
सध्या नागरिक रस्त्यांवरच येत नसल्याने सोनसाखळी चोरी, भांडणे, खून, अपघात असे गुन्हे अत्यंत कमी झाले आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिस कठोर कारवाई करत आहेत. लहान गुन्ह्यांमध्ये अटक पुढे ढकलली जात आहे. गंभीर नसलेल्या प्रकरणांत जामिनाला विरोध केला जात नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी 67 टक्क्यांनी घटल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
महत्वाची बातमी : ठाण्यात पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा
आकडा शून्यावर :
गेल्या वर्षी मार्चमध्ये चोरीचे 484 गुन्हे नोंदवण्यात आले, परंतु या मार्चमध्ये हा आकडा जवळपास शून्यावर आला आहे. गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, मोबाईल-पर्स-बॅग-पाकिटे पळवण्यासारखे गुन्हे घडतात. लॉकडाऊनमुळे गर्दी होत नसल्याने चोरीचे गुन्हे घटले आहेत. नागरिक दिवस-रात्र घरातच असल्यामुळे घरफोड्याही होत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.