Crime: एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे व त्याच्या मेन्टनन्सचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच एटीएममधील कॅसेटमध्ये छेडछाड करून त्यातील तब्बल सव्वासात लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशाल रामदास पाटील (३०) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
विशाल पाटील हा पनवेलमधील रिटघर येथे राहण्यास असून तो मुंबईतील रायटर बिझनेसन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीच्या कळंबोली शाखेत काम करत होता. कंपनीच्या वतीने वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरणे, एटीएमच्या तांत्रिक अडचणी सोडवणे तसेच एटीएममधील पैशांची माहिती ठेवणे अशी कामे केली जातात.
विशाल पाटील याच्याकडे खारघर परिसरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरणे, त्यांची देखरेख व मेन्टनन्सचे काम होते. ऑक्टोबर-२०२२ मध्ये त्याने खारघर सेक्टर-३५डी मधील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधील कॅसेटमध्ये छेडछाड करून त्यातून तब्बल सव्वा सात लाख रुपये काढून घेतले होते.
चार लाख रुपये दिले परत
कंपनीने तपासणी केल्यानंतर एटीएममध्ये ठेवलेली एकूण रक्कम व काढलेली रक्कम यांच्यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामध्ये सात लाख २५ हजार ७०० रुपये कमी असल्याचे आढळून आले होते.
त्यानंतर एटीएमची पाहणी करणाऱ्या विशाल पाटील व संतोष करुंगलेकर या दोघांकडे विचारपूस केली असता, विशाल पाटीलने एटीएममधील पैसे काढल्याचे कबूल केले. त्याने चार लाख २० हजार रुपये परतदेखील दिले होते. मात्र उर्वरीत तीन लाख ५७०० रुपये त्याने अद्यापपर्यंत परत दिले नाही. त्यामुळे कंपनीचे शाखा व्यवस्थापक सचिन शिंदे यांनी त्याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.