Unauthorized Hoardings Esakal
मुंबई

Unauthorized Hoardings : उल्हासनगरात अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या जागा व एजन्सी मालकांवर गुन्हे

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : घाटकोपरच्या घटनेनंतर इन ऍक्शन मोडवर आलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या 4 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.त्यात जागा व एजन्सी मालकांचा समावेश आहे.

13 मे रोजी आलेल्या वारा-वादळामुळे घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीची घटना घडली होती.या घटनेची गांभीर्याने दखल घेणारे आयुक्त अजीज शेख यांनी मान्सूनपूर्व कालावधीत अशा दुर्घटना होऊन जीवत हानी होऊ नये म्हणून उल्हासनगर महागनरपालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंग-जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे तसेच अवैध व धोकादायक असणारे होर्डिंग तातडीने निष्कासनाची कार्यवाही करुन संबधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश अजीज शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त गणेश शिंपी,मनिष हिवरे,अनिल खतुरानी,दत्तात्रय जाधव यांनी प्रभागनिहाय 47 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.तसेच शहरातील विनापरवानगी अनधिकृत होर्डिंग गॅस कटरने कापून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.यासोबतच आक्रमक पवित्रा हाती घेणाऱ्या पालिकेने महाराष्ट्र मालमत्तेस विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या 4 जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan नोव्हेंबरमध्ये समोरासमोर? जाणून घ्या कोणती स्पर्धा अन् कुठे भिडणार

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

SCROLL FOR NEXT