Kankavli Crop Damage  sakal
मुंबई

Kankavli Crop Damage : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले

Kankavli Crop Damage : परतीच्या पावसाने शेतकर्याचे पार कंबरडे मोडले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.अश्विन महिन्याच्या उत्तरार्धात सुध्दा चित्रा नक्षत्र बरसत असल्याने भात पीक आडवे पडून लोंब्या गळू लागल्या आहेत

शामकांत पतंगराव

परतीच्या पावसाने शेतकर्याचे पार कंबरडे मोडले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.अश्विन महिन्याच्या उत्तरार्धात सुध्दा चित्रा नक्षत्र बरसत असल्याने भात पीक आडवे पडून लोंब्या गळू लागल्या आहेत.गेली 35 ते 40 वर्षात पहिल्यांदाच असा पाऊस पडत असल्याचे शेतकरी सांगतात

दिवाळीचा सण उंबरठ्यावर येऊन ठेपलाय तरी शेतकऱ्याला दिवाळी गोड लागणार नाही.यंदाच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.अगोदरच्या समाधानकारक पावसामुळे भात पिक दर्जेदार येईल अशी आशा असतानाच अश्विन महिन्याच्या उत्तरार्धात सुध्दा दररोज सायंकाळी चित्रा नक्षत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार बरसत असल्याने भात पीक आडवे पडून लोंब्या गळू लागल्या आहेत.

भात पीक कापल्यानंतर ते खळ्यात आणून झोडणे,भात सुकविणे व ते व्यापाऱ्याला विक्री करून आलेल्या पैशातून पोराबाळांच्या कपड्यालत्याची, घरातील जिन्नस-सामानाची व फटाक्यांची व्यवस्था करायची असे नियोजन असते ,परंतु या वर्षी सतत बरसत असलेल्या पावसामुळे "नको नको रे पावसा ...."असं म्हणण्याची वेळ आली आहे.

शेतात साठलेल्या पाण्यात पिकाची रोपे आडवी पडली असून दाण्याच्या लोंब्या गळून पडत आहेत.गेली 35 ते 40 वर्षात पहिल्यांदाच असा पाऊस पडत असल्याचे शेतकरी सांगतात .भात कापणीसाठी शेतात गेलेल्या शेतकर्याला पिकाचे विदारक दृष्य बघून डोके धरायची वेळ आली असून चौफेर नुकसानीच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पिक विम्याची आस लागून राहीली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT