CSMT to Dhule new Express will run from today railway marathi news esakal
मुंबई

Mumbai News : आजपासून धावणार सीएसएमटी ते धुळे नवीन एक्सप्रेस !

मुंबई ते धुळे आणि पुणे ते अमरावती दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई ते धुळे दरम्यान रविवारीपासून नवीन ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. तसेच पुणे - भुसावळ एक्स्प्रेस १३ नोंव्हेबर २०२३ पासून दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे अमरावती पर्यंत वाढवली . त्यामुळे मुंबई ते धुळे आणि पुणे ते अमरावती दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ११०२५/ ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेसचा विस्तार १३ नोंव्हेबर २०२३ पासून अमरावतीपर्यंत दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे वळवून करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ११०२५/ ११०२६ पुणे - भुसावळ एक्स्प्रेस १३ नोंव्हेबर २०२३ पासून दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे अमरावती पर्यंत वाढवली आहे.

आणि ट्रेन क्रमांक ११०११/ ११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - धुळे एक्स्प्रेस ही नवीन ट्रेन देखील सुरू करीत आहे. ट्रेन क्रमांक ११०२५ पुणे – अमरावती एक्स्प्रेस १३ नोव्हेंबर २०२३ पासून पुणे येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री १२.५५ वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ११०२६ अमरावती – पुणे एक्स्प्रेस १३ नोव्हेंबर २०२३ पासून अमरावती येथून रात्री १०. ५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी दोन्ही दिशेने उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबणार आहे.

ट्रेन क्रमांक ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - धुळे एक्स्प्रेस १२ नोव्हेंबर २०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १२ वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री २०.५५ वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ११०१२ धुळे - सीएसएमटी १२ नोव्हेंबर २०२३ पासून धुळे येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामधा आणि शिरूड स्थानकांवर थांबणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT