Murder case sakal media
मुंबई

काशीद खून प्रकरणातील आरोपी गजाआड; अल्पवयीन मुलासह एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

मुरूड : तालुक्यातील काशीद (Kashid) येथे काही दिवसांपूर्वी एका विहिरीत मृतदेह सापडला (Dead body found in well) होता. या व्यक्तीचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न होते. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलगा (Minor boy) आणि अन्य एक तरुण असल्याचे स्पष्ट झाले आहेत. सुरुवातीला कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी एका मोबाईलच्या साह्याने या (Murder case investigation) खुनाचा तपास केला.

काशीद येथील खून प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी तपासासाठी मुरूड पोलिस ठाण्यास भेट देऊन पोलिसांचे मनोधैर्य वाढवले होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन वाणी यांनी तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आरोपींना शोधण्याचा प्रयत्न केला.

गुन्हा घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मृत व्यक्तीचा मोबाईल हा एका पिशवीत जंगलात लपविण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार वाणी यांच्यासमवेत पोलिसांच्या पथकाने जंगलात मोबाईल शोधला. त्याआधारे आरोपींना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपी गौरव वाघमारे याला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपी अल्पवयीन असून त्याला कर्जत येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

असे उकलले खुनाचे गुढ

मृत व्यक्तीचा मोबाईल जंगलात सापडल्यानंतर त्याचा ‘लॉक पॅटर्न’ अथक परिश्रमानंतर उघडण्यात पोलिसांना यश आले. मृत व्यक्तीचे नाव विनोद कुमार (४६) असल्याचे पोलिसांना त्या मोबाईलमुळे समजले. विनोद कुमार हा केरळमधील कुन्नूर येथील रहिवासी असून काशीद येथील प्रकृती रिसॉर्ट येथे मसाज करण्याचे काम करीत होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी खून झाला त्या दिवशी (८ फेब्रुवारी) काय घडले, याचा शोध सुरू केला. तेव्हा विनोद हा काशीद येथील आदिवासी वाडीवर मित्राकडे मद्यपान करण्यासाठी गेला होता. या वेळी तिथे गौरव वाघमारे (१९) आणि अन्य एका अल्पवयीन मुलाबरोबर त्याचे जोरदार भांडण झाले. त्या दोघांनी विनोदला बेदम मारहाण केली. या घटनेत विनोदचा मृत्यू झाल्याने आरोपींनी त्याचा मृतदेह विहिरीत ढकलला, असे स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT