Apple IPhone 16 Series ESakal
मुंबई

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Apple IPhone 16 Series: ॲपल आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात झाली आहे. मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग दिसून आली आहे.

Vrushal Karmarkar

अॅपल प्रेमी बऱ्याच काळापासून आयफोन 16 सीरीजची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने नवीन आयफोन सीरीज लाँच केली होती आणि आज म्हणजेच 20 सप्टेंबरपासून या लेटेस्ट ऍपल सीरीजचा सेल ग्राहकांसाठी सुरू होणार आहे. आयफोन 16 सीरीजमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स हे चार नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. मुंबईतील अॅपल स्टोअर सकाळी 8 नंतर उघडतील. परंतु नवीन आयफोन्स मिळविणाऱ्यांमध्ये चाहते काल रात्रीपासून रांगेत उभे आहेत.

मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. हे भारतातील पहिले ॲपल स्टोअर आहे. यामुळे या स्टोअरच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा दिसत आहेत. अॅपलची iPhone 16 सिरीज आजपासून भारतात विक्रीसाठी येणार आहे. यातील अनेक ग्राहक प्रतिक्रिया देत आहेत. यातील एकाने सांगितले की, मी गेल्या 21 तासांपासून रांगेत उभा आहे. मी काल सकाळी 11 वाजल्यापासून येथे आहे आणि आज सकाळी 8 वाजता स्टोअरमध्ये प्रवेश करणारा मी पहिलाच आहे. आज मी खूप उत्साहित आहे. या फोनसाठी मुंबईतील वातावरण अगदी नवीन आहे. गेल्या वर्षी मी 17 तास रांगेत उभा होतो. असे तो म्हणाला.

ॲपलच्या या नवीनतम मालिकेची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि Amazon वर सुरू होईल. या शिवाय कंपनीच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकृत स्टोअर्सवर उपलब्ध होईल. यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली आहे. ऍपलच्या अधिकृत साइटवरील सूचीनुसार, कंपनी जुन्या फोनची देवाणघेवाण करण्यासाठी 4,000 ते 67,500 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय, तुम्हाला Axis, ICICI आणि American Express बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5,000 रुपयांच्या झटपट कॅशबॅकचा लाभ मिळेल. एवढेच नाही तर ग्राहकांच्या सोयीसाठी 3 आणि 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयचीही सुविधा आहे.

iPhone 16 ची भारतात किंमत

आयफोन 16 चे तीन प्रकार लॉन्च केले गेले आहेत, 128GB, 256GB आणि 512GB. या तीन प्रकारांच्या किमती अनुक्रमे 79,900 रुपये, 89,900 रुपये आणि 1,09,900 रुपये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Manifesto 2024: महिलांना मोफत बस प्रवास, 500 रुपयांत गॅस, शेतक-यांची कर्जमाफी आणि बरंच काही..... असा आहे 'मविआ'चा 'महाराष्ट्रनामा'

Manoj Jarange Patil: कचाकच पाडा... जरांगेंची भूमिका स्पष्ट! फडणवीसांना गुडघ्यावर टेकवणार, काय म्हणाले?

India Vs US Economy: 2024 मधील आर्थिक परिस्थितीची तुलना केल्यास काय दिसते?

KKR ने संघातून काढले म्हणून गडी पेटला! ९ चौकार, ६ षटकारांसह ट्वेंटी-२० वादळी शतक ठोकले; नोंदवला World Record

जर्मनीमध्ये ४ लाख मराठी तरुणांना जॉब ऑफर, जर्मनी आणि महाराष्ट्राची पार्टनरशीप कशी सुरू झाली ? जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT