cyber crime news Sachin Tendulkar private security guard became victim of cyber crime mumbai esakal
मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खाजगी सुरक्षा रक्षक ठरला सायबर गुन्ह्याचा बळी

फसवणूक करणार्‍या आरोपीनेने पिडीत सुरक्षा ला बँकिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कर्जासाठी 8,200 रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खाजगी सुरक्षा रक्षकाची सायबर-फसवणुक झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सचिन तेंडुलकर यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाला कोटक महिंद्रा बँकेचा एक्झिक्युटिव्ह म्हणून सांगत फसवणूक करणाऱ्या आरोपीचा फोन आला. त्याने त्याला कर्जाची गरज आहे का असे विचारले त्यावर सुरक्षा रक्षकाने आपल्याला पैशांची गरज असल्याचे सांगितले आणि कर्ज घेण्यास होकार दिला होता. आरोपीने त्याला त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे तपशील व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवण्यास सांगितले. तक्रारदाराने आरोपीला विचारलेले सर्व तपशील पाठवले.

फसवणूक करणार्‍या आरोपीनेने पिडीत सुरक्षा ला बँकिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कर्जासाठी 8,200 रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले. नंतर कर्जावर प्रक्रिया शुल्क आकारण्याच्या बहाण्याने फसवणूक करणार्‍याने तक्रारदाराला 10,000 रुपये पाठवण्यास सांगितले आणि त्यानंतर त्याला 1.50 लाख रुपये कर्ज मिळेल असे आमिष दाखविले. परंतु जेव्हा कर्ज मिळाले नाही आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून 14 जुलै रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. वांद्रे पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT