Mumbai News  sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईवर वादळी संकट; होर्डिंग कोसळून ८ जणांचा मृत्यू,५५ जखमी

मुंबईला आज धुळीच्या वादळासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये सायंकाळी साडेचारला एक मोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ जण मृत्युमुखी पडले, तर ५५ जण जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईला आज धुळीच्या वादळासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये सायंकाळी साडेचारला एक मोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ जण मृत्युमुखी पडले, तर ५५ जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत येथे मदत आणि बचाव कार्य सुरू होते. या ढिगाऱ्याखाली आणखी २० ते ३० जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे वडाळ्यात पार्किंग लिफ्ट कोसळून आठ जण जखमी झाले. मुंबईतील दुर्घटनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तसेच विनापरवाना होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले आहेत. घाटकोपरप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून, जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे.

पुणे, किवळेतील जुन्या घटना

पुण्यात २०१८ मध्ये जुना बाजार चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून दोघांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले होते. त्याचप्रमाणे किवळेजवळ २०२३ मध्ये होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता.

वादळ अन् जोराचा पाऊस

मुंबईत सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाआधी धुळीचे वादळ सुरू झाले. यामुळे संपूर्ण वातावरणात धुळीचे लोट उठल्याचे दिसले. यामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. यानंतर पुढील पाच मिनिटांतच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कुलाबा, दादर, परळ परिसरालाही पावसाने झोडपून काढले. भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, धारावी, कांजूरमार्ग येथे धुळीच्या वादळासह जोरदार पाऊस झाला. देवनार, चेंबूर, मानखुर्द यासह मुलुंड-भांडूपमध्ये धुळीच्या वादळासह जोरदार पाऊस झाला. ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली परिसरालादेखील पावसाने झोडपून काढले.

रेल्वे वाहतुकीला फटका

वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे आज तीन तेरा वाजले. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेवर दीडशे लोकल फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली तर शेकडो गाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या आणि सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ठाणे स्थानकात सकाळी साडे नऊच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्व मार्गिकेवरील सिग्नल यंत्रणा कोलमडली होती परिणामी कल्याण ते कुर्ला दरम्यानची लोकल सेवा खोळंबली होती.

दिवसभरात

  • पावसामुळे मेट्रो दोन तास ठप्प

  • रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला

  • विमान वाहतुकीला फटका

  • लोकल वाहतूक विस्कळित

कार पार्किंग कोसळले

  • वडाळा बरकत अली रोडवर लोखंडी कार पार्कींग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून, आठ जण जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT