corona patients decreasing in mumbai sakal
मुंबई

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्याने यंत्रणेवरील भार हलका

सक्रिय कोरोना रुग्ण घटले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहेत. दररोज २५० ते ३०० च्या दरम्यान रुग्ण आढळत असल्याने पालिकेवरचा भार कमी होत असला, तरी ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे पालिका सतर्क झाली आहे, परंतु दैनंदिन रुग्णांची संख्या सातत्याने घटत असल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे.

१ ऑक्टोबरपासून मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये जवळपास ६० टक्के घट झाली आहे. मुंबईत १ ऑक्टोबर या दिवशी चार हजार ८१० सक्रिय रुग्ण होते. ही संख्या घटून १४ डिसेंबरपर्यंत १७६९ पर्यंत कमी झाली आहे; तर १ डिसेंबर रोजी ही संख्या १,९०४ आणि १४ डिसेंबर रोजी १७६९ पर्यंत घसरली. गेल्या ३० दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये सरासरी ५२.६७ टक्क्यांनी घट झाली आहे. घटत्या रुग्णसंख्येबद्दल नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

एक काळ असा होता, जेव्हा सक्रिय रुग्णांची संख्या ९७ हजारांवर गेली होती. ही संख्या १८०० वर येत असल्याने पालिकेच्या उपाययोजनांना यश येत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी आपले शस्त्र खाली ठेवून बिनधास्त होऊ नये. नियमांचे पालन करून कोरोना विषाणू आणि त्याच्या प्रकारांवर मात करणे गरजेचे असल्याचे कोविड-१९ मृत्यू निरीक्षण समितीप्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

सक्रिय रुग्णांचा आढावा

१ ऑक्टोबर : ४,८१०

१ नोव्हेंबर : ३,६८९

१५ नोव्हेंबर : २,७७५

३० नोव्हेंबर : २,०५२

१ डिसेंबर : १,९०४

१४ डिसेंबर : १,७६९

पालिकेने सणासुदीच्या काळात कोरोना रुग्णांवर बारीक नजर ठेवली आहे. शहरात मिशन सेव्ह लार्इव्हजची कडक अंमलबजावणी केली होती. आमचे मुख्य लक्ष्य दैनंदिन संख्या कमी करणे आणि मृत्यूंची संख्या एकअंकी करणे हे आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधाही सज्ज आहेत. यात जम्बो सुविधांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

- सुरेश काकाणी,अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

लसीकरण झालेले

रुग्ण कोणत्याही किंवा सौम्य लक्षणांशिवाय बरे होत आहेत. ज्या नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत आणि तरीही त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे यापुढील काळात जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्‍यक आहे.

- डॉ. गौतम भन्साळी, खासगी रुग्णालयांचे मुख्य समन्वयक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT