dalit and Muslim voters support maha vikas aghadi lok sabha election 2024 Sakal
मुंबई

दलित व मुस्लिम मतदारांचे ‘मविआ’ला पाठबळ; सर्वच्या सर्व आरक्षित मतदारसंघात विजय

दीपा कदम deepakadam3@gmail.com

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मविआच्या या यशात राज्यातील दलित आणि मुस्लिम मतदारांचा मतांचा वाटा सर्वाधिक असल्याचे खुद्द महायुतीचे नेते निकालानंतर बोलताना दिसत आहेत. राज्यात अनुसूचित जातींसाठी आरक्षित सहाही मतदारसंघात ‘मविआ’च्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

शिवाय मुंबईतील खुला मतदारसंघ असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून ‘मविआ’च्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. त्यामुळे ‘मविआ’कडून एकूण सहा दलित उमेदवार लोकसभेत जाणार आहेत. राज्यातील सर्व आरक्षित जागा ‘मविआ’ने जिंकल्याने येत्या काही महिन्यातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मोठे

आव्हान उभे राहणार आहे. त्याला कारण म्हणजे राज्यात अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या विधानसभेच्या तब्बल १९ जागांवर ‘मविआ’ने तर १० जागांवर महायुतीने आघाडी घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते. यातील ‘मविआ’ने आघाडी घेतलेल्या अनेक जागांवरील विद्यमान आमदार हे महायुतीसोबत आहेत.

घटनाबदलाचा मुद्दा निर्णायक

राज्यघटना बदलण्यासाठी आम्हाला बहुमत हवे, अशी जाहीर वल्गना कर्नाटकातील अनंतकुमार हेगडे आणि इतर नेत्यांनी केल्यामुळे ‘इंडिया आघाडी’ने त्याचा निवडणूक प्रचारात मुद्दा केला. त्याचा परिणाम दिसून आला.

‘‘निवडणूक आयोग स्वतंत्र आणि पारदर्शी असावा अशी भूमिका आंबेडकर, नेहरू आणि पटेल या तिघांची होती. म्हणूनच निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची निवड करणाऱ्या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश होता.

त्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळणे हीच राज्यघटना बदलण्याची सुरुवात आहे. वंचित समाजाने हे ओळखले.’’ असे मत माजी खासदार व नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

राज्यात ‘मविआ’च्या नेत्यांनी संविधान बदलण्याचे खोटे कथानक रचल्याचा दावा भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका सभेत केला होता. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी २९ जागा आरक्षित आहेत.

राज्यात एकूण जागांपैकी जवळपास ४० ते ४५ जागांवर दलित मतदार प्रभावी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळेच राज्यात दलित, मुस्लिम व आदिवासी समाजाला वगळून राजकारणात राजकीय यश मिळवता येत नाही हा धडा जणू लोकसभेच्या या निकालाने तमाम राजकीय पक्षांना दिला आहे.

दलित मतांची आघाडीला साथ

लोकसभा अनुसूचित राखीव मतदारसंघ

सोलापूर - प्रणिती शिंदे (मविआ- काँग्रेस)

अमरावती - बळवंत वानखेडे (मविआ - काँग्रेस)

रामटेक - श्याम बर्वे (मविआ - काँग्रेस)

डॉ. काळगे ( मविआ - काँग्रेस)

भाऊसाहेब वाकचौरे (मविआ - शिवसेना ठाकरे)

याशिवाय खुला मतदारसंघ असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून मविआ - काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड निवडून आल्या आहेत

भाजपने सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर राज्याचा पाया उभा करण्याचा प्रयत्न केला. कंत्राटीकरण करणे म्हणजेच आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करणे होय. आरक्षणामुळे ज्या समाजाला नोकऱ्या मिळत होत्या तेच यांनी संपवले. भाजपच्या प्रतिक्रांतीच्या विरोधातील हा उठाव आहे. राज्य घटनेची मोडतोड करणे म्हणजे भारतीयत्वाची तोडमोड करणे होय.

- अर्जुन डांगळे, ज्येष्ठ राजकीय अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT