मुंबई: मोसमातील पहिल्याच पावसाने मुंबईला (Mumbai rain) दणका दिला आहे. पावसामुळे पाणी साचल्याने मुंबईच्या वेगाला ब्रेक लागलाच पण त्याचबरोबर काही ठिकाणी नुकसानही झाले. पावसाने मध्य रात्री पासून जोरदार मुसंडी मारल्याने मुंबईच्या काही भागात चित्र निर्माण झाले होते. मुंबई मनपाची पावसाळ्या पूर्वीची अनेक कामे अर्धवट पडून राहिल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. (Damage in mumbai because of first rain)
घाटकोपरमध्ये संरक्षक भिंत ढासळली
घाटकोपर पश्चिमेकडील रामनगर ( अ ) डकलाईन येथे दीड महिन्यांपूर्वी बांधलेली संरक्षण भिंत आज पावसात ढासळली. संरक्षण भिंतीचा अर्धा कट्टा कोसळला असून उर्वरित भिंतीला बारिक छिद्र पडले आहे. त्यामुळे पहिल्या पावसात मनपाने बांधलेल्या संरक्षण भिंतीचा निकृष्टपणा समोर आला आहे. ज्या कंत्राटदाराने ही भिंत बांधली मनपा प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का अशी असा सवाल येथील कार्यकर्ते अशोक बैरागी यांनी केला आहे.
वडाळ्यात वाहनांचे नुकसान
संततधार सुरू असलेल्या पावसामुळे बुधवार वडाळ्यातील विद्यालंकार कॉलेज परिसरात ठीक ठिकाणी पाणी साचले असून या पाण्यातून वाट काढणे नागरिकांना मोठ्या कसरतीचे झाले आहे. पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत असून येथील रस्त्याकडेला उभी असलेली चारचाकी, दुचाकी वाहने पाण्यात गेली असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अंधेरीत झोपडपट्ट्यांवर झाड पडली
काही झोपडपट्ट्यांमध्ये लोकांच्या घरावर झाड सुधा पडली होती. परंतु बीएमसी कर्मचऱ्यांनी घटनास्थळी जाऊन झाडं बाजूला केली. त्याच बरोबर कांदिवली पूर्वेला शिवसेना माजी नगरसेवक योगेश भोईर यांनी स्वतः जिवला पाडा येथे नाल्यात उतरून अडकलेला कचरा साफ करून नाल्याची साफसफाई केली. बऱ्याच प्रमाणात झोपडट्टीवासीयांना या पावसा मुळे लोकांच्या घरात पाणी गेल्याने .त्यामुळे त्यांचे नुकसानही झाले आहे.
टिळक नगर येथे झाड कोसळून दोन गाड्यांचे नुकसान
टिळक नगर येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने पार्क करण्यात आलेल्या दोन वाहनाचे नुकसान झाले आहे. संपूर्ण टिळक नगर परिसरात पाणीच पाणी साचल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.