Dasara Melava 2024 esakal
मुंबई

Dasara Melava : शिवाजी पार्क मिळविण्यासाठी शिवसेना गट जाणार न्यायालयात

शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी न मिळाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी आता शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी न मिळाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी आता शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.

शिवाजी पार्क मैदानावर २४ ऑक्टोबर रोजी 'दसरा मेळावा' घेण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पालिकेचे जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना पत्रं देण्यात आले आहे. ठाकरे गटातर्फे तर ३ ऑक्टोबर रोजी स्मरणपत्रही दिले आहे.

मात्र अद्यापही ठाकरे गटाला पलिकेकडून होकार अथवा नकार कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिवसेना आमदार, नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुन्हा एकदा जी- उत्तर विभाग अधिकाऱ्याची भेट घेतली.

येत्या दोन दिवसात परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे विभाग अधिक-यांनी शिवसेना नेते परब यांना सांगितले. त्यामुळे आता दोन दिवस पालिकेच्या उत्तराची वाट बघू त्यानंतर न्यायालयात जाण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. गेल्या ३ ऑक्टोबर रोजी पालिकेला ठाकरे गटाने स्मरणपत्रही दिले होते.

१ ऑगस्ट रोजीही शिंदे गटाने अर्ज दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते. मात्र १ ऑगस्ट रोजी अर्ज देणारे आमदार सदा सरवणकर यांचे अर्जावर फक्त नाव दाखवले जात असून इतर काहीच माहिती नाही. त्यामुळे शंका निर्माण होत असल्याचे आमदार परब यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT