मुंबई : मुंबई महापालिकेद्वारे युद्ध स्तरावर केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोना हळूहळू नियंत्रणात येत आहे. तर, दुसरीकडे पावसाळी आजारांवर मात देण्यातही यश आलं आहे. याच पार्श्वभूमीवर, यावर्षाच्या सप्टेंबर महिन्यात लेप्टो, डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. गेल्या 15 दिवसांत मलेरियाच्या रुग्णांमध्ये 4 टक्क्यांनी घट झाली आहे. लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ही कमतरता आली आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे पावसाळी आजार नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रासह मुंबईत पावसाची रिपरिप कायम असून पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. मात्र, पालिकेने सर्व उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे.
मुंबईत ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांसह पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये ही वाढ झाली. त्यामुळे, पालिकेसमोर मोठे आवाहन उभे राहिले होते. 2 सप्टेंबरपर्यंत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 137, लेप्टोचे 45 आणि डेंग्यूचे 10 रुग्ण सापडले.
वर्ष - मलेरिया रुग्ण
वर्ष - डेंग्यू रुग्ण
वर्ष - लेप्टो
पावसाळी आजारांसाठी बेड्स तैनात -
कोरोनासोबत पावसाळी आजारांसाठी विशेष बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये विशेष दिड हजार बेडस राखीव ठेवण्यात आले आहेत. केईएम, सायन, कूपर आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अजून नायरचा विचार केलेला नाही. पण, हळूहळू इथले विभाग सुरू केले जातील. - डाॅ. रमेश भारमल, प्रमुख, पालिका रुग्णालये
महत्वाची बातमी मुंबईकरांनो अत्यंत महत्त्वाची बातमी, उद्यापासून KEM मध्ये सुरु होणार कोविशील्ड लसीच्या चाचण्या
पावसाळी आजारांसाठी पालिका रुग्णालये सज्ज -
या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह पेरिफेरल रुग्णालयांमध्ये पावसाळी आजारांसाठी दिड हजारांवर बेड्सची सोय करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्यूचे डास होऊ नये म्हणून पालिकेकडून फवारणी केली जात आहे. पण, नागरिकांनी पाणी साचू देऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. ताप, डोकेदुखी, उलटी, थकवा अशी काही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.
स्वाईन फ्लूचा फक्त एक रुग्ण -
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचा 13 सप्टेंबरपर्यंत फक्त एकच रुग्ण आढळला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्लू चे 9 रुग्ण आढळले होते. मात्र, ही संख्या या महिन्यात फक्त एक आहे. गेस्ट्रोच्या रुग्णांमध्ये ही हळूहळू वाढ होत असून 49 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, कोरोनापासून बचाव करता करता आता मुंबईकरांना पावसाळी आजारांपासून वाचवणे हे देखील आवाहन पालिकेसमोर आहे.
( संपादन - सुमित बागुल )
data of monsoon monsoon related illness is relieved read full data issued by BMC
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.