Neelotpal, New dcp of zone 2 sakal media
मुंबई

मुंबई : झोन 2 च्या डिसीपींची तडकाफडकी बदली; निलोत्पल यांची नियुक्ती

प्रशांत कांबळे

मुंबई : अंगडीया खंडणी प्रकरणात (Angadia extortion case) यापूर्वीच झोन 2 चे डीसीपी सौरभ त्रिपाठी (DCP saurabh tripathi) यांना निलंबित केल्यानंतर डीसीपी योगेशकुमार यांच्याकडे झोन 2 चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. याच झोन मध्ये शरद पवार (sharad pawar) यांचा सिल्वर ओक बंगला येतो. दरम्यान शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर तडकाफडकी डीसीपी योगेशकुमार (Yogesh kumar shunted) यांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेत सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलोत्पल (dcp neelotpal) यांना नवीन कायमस्वरूपी डीसीपी म्हणून नियुक्त करण्यात आले.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी हल्ला केला. याप्रकरणी 109 एसटी कर्मचाऱ्यांना आणि कट रचण्याच्या आरोपावरून ऍड.गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आझाद मैदानावरून आपल्या गावी जातील अशी अपेक्षा होती.

मात्र, शुक्रवारी अचानक भरदिवसा 3 वाजताच्या दरम्यान पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करतांना पोलीस यंत्रणेला याची माहिती नव्हती का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिवाय राज्याच्या गृहविभागावर विरोधी पक्षानेही टीका केली असून, त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने विश्वास नागरे पाटील यांनी ही कारवाई केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT