डोंबिवली : जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वीच घडली होती. महेश गायकवाड यांना पुन्हा एकदा समाज माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून महेश हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दीपक कदम नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे समोर आले असून, या प्रकरणी गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
द्वारली येथील जमीनीच्या वादातून कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर थेट हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार करत त्यांना जखमी केले होते. याप्रकरणी आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. तर महेश गायकवाड हे उपचार घेऊन परतल्यानंतर राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच ही घटना कल्याण मध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून शिवसेना शिंदे गटात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयामुळे आनंदाचे वातावरण असतानाच, अचानक शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले महेश यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय गोटात थोडी खळबळ माजली आहे.
फेसबूक अकाऊंटवरुन दीपक कदम नावाच्या व्यक्तीने महेश यांना ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन असे या धमकीत म्हटले आहे. ही धमकी येताच शहर प्रमुख गायकवाड यांनी कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन धमकी देणाऱ्या कदम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. फेसबूक अकाऊंटवरुन जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. धमकी देणारा कदम हा व्यक्ती कोण आहे? त्याने अशा प्रकारे धमकी का दिली? या प्रकरणाचा उलगडा तपासअंती होणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.