Sanjay Raut ESakal
मुंबई

Narendra Modi यांच्या दौऱ्यात पाऊस, आता ते पावसावरही ईडी, सीबीआय लावतील, राऊतांचा हल्लाबोल

Vrushal Karmarkar

राज्यसभा खासदार संजय राऊत यांना गुरुवारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यांना 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबईतील माझगाव येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांनी राऊत यांना 25,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यानंतर १५ हजारांच्या जातमुचक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही मला कितीही शिक्षा देऊ शकता, मला कोणतीही अडचण नाही. तुम्ही न्यायालयाचा आदेश वाचा, मी काहीही चुकीचे बोलले आहे, असे न्यायालयाने म्हटले नाही. न्यायालयाने म्हटले आहे की ते जनहितासाठी आहे. आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खाण्यासाठी जातात. हे संपूर्ण देश पाहत आहे. आमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना न्याय कुठे मिळणार, शिक्षा कुठे मिळणार?, असं ते म्हणाले आहेत.

आज पुण्यात नरेंद्र मोदींचा दौरा होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधांनांच्या दौऱ्यात पाऊस पडला आहे. आता नरेंद्र मोदी पावसामागे ईडी आणि सीबीआय लावतील, असं म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, कोर्टाने म्हटलं आहे की, याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या आहेत. मात्र किरीट सोमय्या जेव्हा खोटे आरोप करतात तेव्हा इतरांना वेदना होत नाही का? माझी जेलमध्ये जायची तयारी आहे. मी डरपोक नाही. आम्ही सत्यासाठी संघर्ष करताना जेलमध्ये जाऊ, असं राऊत म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किंग कोहलीला भेटण्याची ओढ! Virat Kohli साठी १५ वर्षीय मुलाचा तब्बल ७ तास सायकल प्रवास

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... BCCI ची मोठी घोषणा, बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

Solapur Crime: राष्ट्रीय खेळाडूने नदीपात्रात उडी घेत जीव दिला; नेमकं काय घडलं?

Nicholas Pooran ने मोडला पाकिस्तानच्या रिझवानचा मोठा विक्रम! २०२४ वर्षात ठरला नंबर वन

Latest Maharashtra News Live Updates : गुजरातमधील बरडियाजवळ द्वारका-जामनगर महामार्गावर बस आणि दोन कार यांच्यात मोठी धडक

SCROLL FOR NEXT