मुंबई

ऑक्झीमिटर आणि थर्मामीटरची खरेदी रखडण्याची शक्यता, कारण आहे...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर पालिकेची ऑक्झीमिटर आणि थर्मामीटरची खरेदी रखडण्याची शक्यता आहे. या दोन वैद्यकिय उपकरणासाठी ठरविण्यात आलेले निकषांंवरच आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने निवीदा प्रक्रीयेचा फेर आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका उणे 30 ते 500 अंशा पर्यंत तापमान मोजता येईल असले थर्मामीटर खरेदी करण्यात येणार आहे.या थर्मामीटरमुळे व्यक्तीला स्पर्शही न करता उष्णांक मोजता येतो. तसेच रक्तातील ऑक्सीजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्झीमिटरही घेण्यात येणार होते. यासाठी ड्युएल कलर,ओएलईडी डिस्प्ले,पल्स ऑक्झीमिटर हे निकष ठरविण्यात आले आहे. मात्र, तज्ञांच्या मते हे अतिउच्च दर्जाचे निकष आहेत. त्यामुळे नाहक दर वाढणार असून उपरणंही उपलब्ध होण्यास अडचणी येतील असा आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

अंधेरी पश्चिम येथील भाजपचे  आमदार अमित साटम यांनी खरेदीवर आक्षेप घेतला आहे. थर्मामीटरसाठी' 6 हजार 500 आणि ऑक्झीमिटरसाठी 1 हजार 500 प्रत्येकी दर ठरविण्यात आला आहे. बाजार भावापेक्षा हा दर जास्त आहे. असा आक्षेप नोंदवत साटम यांनी आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे तक्रार नोदवली. या उपकरणांच्या निविदा अटींचा फेर आढावा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेने याच निकषांच्या आधारे 450 ऑक्झीमिटर खरेदी केलेे आहेत. पण प्रत्यक्षात पालिकेने ठरवलेले निकष आणि विकत घेतलेल्या उपकरणाची पडताळणी केल्यास त्यात तफावत दिसून येईल असा आरोपही साटम यांनी केला. 

तूर्तास महापालिकेने या निविदा प्रक्रीयेला स्थगिती दिली आहे. पण, हे निकष पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवले आहेत. असा दावा पालिकेच्या एका अधिकार्याकडून करण्यात आला.

delays in buying pulse oximeter and thermometer in BMC read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT