arvind kejriwal 
मुंबई

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

कार्तिक पुजारी

मुंबई- इंडिया आघाडीची सभा भिवंडी येथे होत आहेत. सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले इत्यादी नेते उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

दिल्लीमध्ये मी सर्वांना मोफत वीज देतो. त्यामुळे ते मला तुरुंगात टाकू पाहात आहेत. तुम्ही मोठे नेते आहात. संपूर्ण देशात वीज मोफत करुन दाखवा. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी सर्व विरोधकांना संपवलं आहे. बांगलादेशमध्ये सर्व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये देखील अनेकांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांना भारतात देखील हेच करायचं आहे, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

दिल्लीमध्ये सगळ्यांना मोफत उपचार दिले जातात. पण, गरिबांना दिलेला उपचार मोदींना आवडत नाही. सर्वांना मोफत औषधं दिले जातात. पण, जेव्हा मी तुरुंगात गेलो, तेव्हा त्यांनी माझे औषधं बंद केले. मला १५ दिवस इन्सुलिन दिलं नाही. २१ दिवसासाठी मी बाहेर आलो आहे. निकाल लागेल तेव्हा मी तुरुंगात असेन. पण, इंडिया आघाडीला राज्यात ४२ जागा मिळतील, असं केजरीवाल म्हणाले.

एकवेळ अशी होती पाकिस्तान, बांगलादेश आपल्याकडून शिकत होते. आज मोदी त्यांच्याकडून शिकत आहेत. काँग्रेसचे बँक खाते फ्रिज केले. शिवसेनेचे दोन तुकडे केले. ममतांच्या किती मंत्र्यांना अटक केली? मोदी कायर आहेत. बहादूर आहात तर आमने-सामने लढा. देशातील लोकतंत्र संवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा घणाघात केजरीवाल यांनी केला.

शरद पवार यांना पंतप्रधान मोदी यांनी भटकती आत्मा म्हटलं. एका वरिष्ठ राजकीय नेत्याला असं बोलणं योग्य आहे का? शिवसेना फोडली पण, उद्धव ठाकरेंना नकली शिवसेना म्हणत आहेत. यांना आपल्याला निवडणुकीत धडा शिकवायचा आहे. मोदींनी सर्व नेत्यांना बाजूला केलं आहे. आता फक्त योगी आदित्यनाथ राहिले आहेत. त्यांना देखील बाजूला केलं जाईल, असं केजरीवाल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT