मुंबई : मुंबई महानगरपालिकेने (BMC) कस्तुरबा रूग्णालयात (Kasturba hospital) डेल्टा प्लस व्हेरियंटच्या चाचण्या (deltaplus test) करण्याची यंत्रणा उभारल्याने आता मुंबईतच (mumbai) डेल्टा प्लसच्या चाचण्या सुरू होणार आहेत. त्यामुळे पुण्याच्या एनआयव्ही (Pune niv) प्रयोगशाळेत तापसणीसाठी नमुने पाठवणे बंद करण्यात आले आहे. कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत (Kasturba hospital labroratory) दिवसाला 300 नमुने तपासण्याची क्षमता असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष चाचण्यांना सुरुवात होणार आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे (dr mangala gomare) यांनी दिली. ( Delta plus variants test facilities in Kasturba hospital now-nss91)
मुंबईतून डेल्टा प्लसचे 20 ते 25 नमुने दर आठवड्याला पुण्याच्या एनआययव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात होते. आतापर्यंत 600 पेक्षा अधिक नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र चाचणीचा अहवाल यायला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो,यामुळे रुग्णांचे नेमके निदान होण्यास विलंब होतो. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने मुंबईतच डेल्टा प्लस प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कस्तुरबा रुग्णालयात अमेरिकेहून मागवण्यात आलेले 6 कोटी रुपयांचे मशीन दाखल झाले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या होणार असल्या तरी डेल्टा प्लसच्या चाचण्या सरसकट होणार नसून निवडक होणार आहेत,त्यांचे निकाल केवळ 4 दिवसात येणार आहेत अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी दिली.
मुंबईत आतापर्यंत डेल्टा प्लसचे 600 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. उपचार करून देखील अनेक रुग्णांना आराम मिळत नाही,काही रुग्ण रुग्णालयात दाखल होताच दगावतात तर काही रुग्णांना वेगळी लक्षणे जाणवतात अशा संशयित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लस च्या तपासणीसाठी पाठवले जातात अशी माहिती ही डॉ.गोमरे यांनी दिली. नुकतेच पालिकेच्या मुलुंड येथील कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरला दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाला आहे. तिच्या स्टॅब सॅम्पलची चाचणीही या डेल्टा प्लस मशीनमध्ये केली जाणार आहे.
या मशीनमुळे कोरोनाचा कोणता म्युटंट आहे याचे निदान होऊन कमी वेळेत योग्य आणि अधिक उपचार केले जाऊ शकणार आहेत .संशयित डेल्टा प्लस चे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवणे बंद करण्यात आल्याचे डॉ.गोमारे यांनी सांगितले. शेवटचे नमुने 15 दिवसांपूर्वी पाठवण्यात आले असून यानंतरचे नमुने कस्तुरबा मधील प्रयोगशाळेत तपासणार असल्याचे ही डॉ.गोमारे म्हणाल्या. एका चाचणीसाठी 10 ते 12 हजार रुपये खर्च येणार असला तरी महापालिका या चाचण्या मोफत करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.