डोंबिवली - तिसऱ्या अपत्याची खोटी माहिती देणाऱ्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दहिसर ग्रामपंचायतीच्या सदस्या व विद्यमान सरपंच सुनिता भरत भोईर यांच्या वर कायदेशीर कारवाईची शक्यता वाढल्याने शिवसेनेकडील एक सरपंचपद कमी होण्याची शक्यता आहे. भोईर यांनी 2014 मध्ये ग्रामपंचायत निवडणुक लढवताना त्यांनी त्यांचे तिसरे अपत्य अंकित याचा सादर केलेला जन्मदाखला खोटा असून त्याचा जन्म 2002 मध्ये झालेला असल्याने ग्रामपंचायत अधिनियमानुसार त्यांचे सदस्यव सरपंचपद रद्द करावे अशी मागणी याच गावचे रहिवासी काळुराम भोईर यांनी सर्व पुराव्यांसह अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडे केली आहे.
त्यानुसार मंडल अधिकारी यांनी आपला चौकशी अहवाल सादर केला असून पुढील सुनावणी लवकर आहे. त्यामुळे खोटे जन्मदाखले देऊन तिसरे अपत्य असल्याचे लपविल्या प्रकरणी सुनिता भोईर यांच्या वर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
बाबत सविस्तर माहिती अशी, सध्या सरपंच असलेल्या सुनिता भोईर यांना पहिली मुलगी अस्मिता(जन्म दिनांक 23/3/1997) दुसरा मुलगा रोहित (जन्मदिनांक 20/10 1998) व तिसरा मुलगा अंकित (खरा जन्मदिनांक 17/2/2002) परंतू शासन अधिनियमानुसार 12 सप्टेंबर 2001 नंतर ज्यांचे तिसरे अपत्य जन्मले असेल तर ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात त्यामुळे भोईर यांनी सादर केलेले जन्म प्रमाणपत्र साक्षांकित न केलेले नवी मुंबई महापालिकेचे नमुना नंबर 7 रजिस्टर उतार्या नुसार अनु.क्रमांक 68 वर कु.अंकित भरत भोईर, आई सुनिता भरत भोईर व जन्म दिनांक 17 /02/2002 असे नमूद आहे. पण सादर केलेली प्रत जन्मप्रपाणपत्र 26682 दि.17 02 2095 ची असून त्यावर जन्मदिनांक 10 /05/2001 व नोंदणी दिनांक 14 फेब्रुवारी 2005 असा आहे. याप्रकरणी दहिसर ग्रामपंचायतीत 2009 पूर्वी चे दप्तर नसल्याचे व अंगणवाडीतील दस्तऐवज 2014 च्या आगीत जळाल्यामुळे याबाबत संशय अधिक बळावतो असा दावा तक्रारदार काळुराम भोईर यांनी पुराव्यांसह केला आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत काय होते? भोईर यांचे सरपंच पद राहते की जाते अशा चर्चेने दहिसर पंचक्रोशीत जोर धरला आहे .याबाबत सुनिता भोईर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.