मुंबई

चिंताजनक! ठाणे ग्रामीणमध्ये डेंगीची साथ, दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ

राहुल क्षीरसागर

मुंबईः  ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत आहे. त्यात दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनासोबतच डेंगीची ताप डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत 51 जणांना डेंगीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एका संशयित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला आहे. 

पावसाळ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा उद्रेक होत असतो.  मात्र यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इतर आजाराचे रुग्ण गायब झाले की, काय असे चित्र आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांसह आरोग्य विभाग दिवसरात्र काम करत आहे.

असे असताना, दुसरीकडे डेंगी या आजाराने देखील आपले डोके वर काढले असल्याचे दिसून आले. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत 51 संशयित रुग्ण डेंगी तापाच्या साथीने जर्जर झाल्याचे निदर्शनात आले आहे. यापैकी डेंगी साथीत अडकलेले 12 रुग्ण दिवा अंजूर या प्राथमिक आरोग्य केद्राच्या नियंत्रणातील गोदामांच्या पाड्यातील दोन हजार 664 लोकवस्तीच्या वेहेळा गावातील आहेत. यामध्ये एकाला डेंगी तापाची लागण झाल्याचे समोर आले.  तर उर्वरित 12 रुग्णांवर डेंगीचे संशयित रुग्ण म्हणून उपचार केला असता, ते बरे झाले. तसेच भिवंडीतील दाभाड आरोग्य केंद्रातील 571 ग्रामस्थांच्या शेडगांवमध्ये आठ जण साथीच्या आजाराची लागण झाली. त्यावरही डेंगीचे संशयित रुग्ण म्हणून 23 जुलैपर्यंत उपचार झाले असता ते बरे झाले. 

मुरबाड तालुक्‍यात आढळले रुग्ण

मुरबाड तालुक्‍यातील शिरोशी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील खुटाळ या साडेआठशे लोकवस्तीत डेंगीच्या संशयित 26 रुग्णांवर उपचार झाले. त्यातूनही सहा रुग्ण डेंगी तापाचे असल्याचे 10 एप्रिलपर्यंतच्या साथीच्या कालावधीत उघड झाले आहे; तर याच तालुक्‍यातील तुळईजवळील देहरी येथील पाच रुग्णांमध्ये तीन डेंगीचे रुग्ण सापडले आहे. याप्रमाणेच वेल्हे येथील साथीमध्ये दहा संशयितांवरील उपचारात चार डेंगीचे रुग्ण आढळले आहेत.

--------------

(संपादनः पूजा विचारे)

Dengue outbreak rural Thane increasing number patients day by day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT