अंधेरी : लालफितीत अडकलेल्या पोलिस हवालदारांचे मुंबईचा फौजदार होण्याचे स्वप्न विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पत्राने पुन्हा एकदा जागे झाले आहे; मात्र निर्णयास वेळ लागल्याने जे सेवानिवृत्त झाले किंवा कोरोनाच्या विळख्यात मृत पावले त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.
सन 2013मध्ये पीएसआय होण्यासाठी अहर्ता असलेली परीक्षा पास होऊनही हवालदारांची पदोन्नती आतापर्यंत लालफितीतच अडकली होती.
वाचा - युजीसी उपाध्यक्षांनी केली विद्यापीठाच्या परीक्षेची दारूसोबत तुलना; शिक्षक विद्यार्थी संघटना आक्रमक
हवालदारांच्या या कुचंबनेची ही व्यथा 'सकाळ'नेही वेळोवेळी मांडली; मात्र आता तब्बल सात वर्षांनंतर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी पीएसआय पदोन्नतीसंदर्भात पत्र काढले असून बुधवारी (ता. 25) यासाठी चौकशी समितीच्या चारही सदस्यांना आपल्या कार्यालयात बोलविले आहे. त्यामुळे पदोन्नतीबाबत वेगाने सुत्र हलत असल्याने हवालदाराचें मुंबईचे फौजदार म्हणजेच पोलिस उप निरिक्षक होण्याचे अपुरे स्वप्न पुर्ण होण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.
पदोन्नतीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीत आस्थापना विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान, एस. जयकुमार (अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र दल मुंबई) आणि महेश पाटील (पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांचा समावेश आहे.
अनेकांचे स्वप्न अपुर्णच
मुंबई पोलीस दलातील जवळपास 500 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. यातील 45 पोलीस हवालदारांनी पोलिस उप निरिक्षक होण्यापूर्वीच 30 मे रोजी पोलिस दलाचा निरोप घेतला. तब्बल 7 वर्ष पदोन्नतीच्या प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव आहेत. तसेच, काही हवालदारांचा कोव्हिडमुळेही मृत्यू झाला आहे; मात्र विभागात आता पदोन्नतीसंदर्भात हालचाली सुरू झाल्याने उर्वरित हवालदारांना पोलिस उप निरिक्षक म्हणून सेवानिवृत्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.