Devendra Fadnavis Sakal
मुंबई

पोलिसांनीच शिवसैनिकांना परवानगी दिली, देवेंद्र फडणवीस भडकले

ओमकार वाबळे

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शिवसेनेवर लक्ष्य साधल्यानंतर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. राणा यांच्या पाठिशी उभे असल्याचं भाजपच्या नेत्यांनी याआधीही स्पष्ट केलं. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांना भेटण्याचा आग्रह धरला. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला जात असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. (Shivsena Attacked on Kirit Somaiya)

गाडीवर फेकलेला दगड थेट सोमय्यांना लागल्याने ते जखमी झाले. यानंतर रात्रभर राजकीय ड्रामा सुरू होता. आता सोमय्यांच्या दिमतीला भाजपने फौज उतरवली आहे. त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis on Kirit Somaiya Attack)

सोमय्यांना झेड सिक्युरिटी असतानाही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनीच शिवसैनिकांना हल्ल्याची परवानगी दिल्याने हा प्रकार घडला. मला मुंबई पोलिसांची शरम वाटते, असं फडणवीस म्हणाले. (Navneet Rana Vs Shivsena)

जे लोक या सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर असे हल्ले करण्याचं काम सुरू आहे. आम्ही 'इट का जवाब इट से देंगे', असं आव्हान फडणवीसांनी दिलंय. देशात नाव असलेल्या मुंबई पोलिसांनी त्यांची अब्रू घालवली असून राज्यात लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सोमय्यांना झेड सिक्युरिटी देण्यात आली आहे. त्यांनी खारला येत असल्याचं अधिकृतपणे सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांचं काम केलं नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही

  • शिवसैनिकांना पोलिसांनीच परवानगी दिली

  • गुंडागर्दी सुरू आहे, शरम वाटायला पाहिजे पोलिसांना

  • कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे

  • रात्रीच्या वेळी एका महिलेला तुरुंगात ठेवता येत नाही

  • सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून नवनीत राणांवर कारवाई झालीय

  • पोलिसांना शरम वाटायला पाहिजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT