Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray 
मुंबई

"वाझे लादेन आहे का हीच मुख्यमंत्र्यांची शेवटची प्रतिक्रिया मला आठवते"

विराज भागवत

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. या आरोपांवरून आज उच्च न्यायालयाने गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. सीबीआय चौकशी दरम्यान गृहमंत्री पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे मत अनिल देशमुख यांनी मांडले आणि पदत्याग केला. या प्रकरणात विरोधकांकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी सुरूवातीपासूनच होत होती. आज अखेर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

"गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता. आता गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन  झाला तरीही कोडं एकच आहे की महाराष्ट्रात इतक्या भयावह घटना घडल्या, कधी नव्हे ते गृहमंत्र्यांवर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर वाईट आरोप लागले असे असतानाही राज्याचे मुख्यमत्री अद्यापही यावर काहीच का बोलत नाहीत? सरकार विचित्र स्थितीत असताना त्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे. 'वाझे लादेन आहे का, ही मुख्यंत्र्यांची शेवटची प्रतिक्रिया मला आठवते आहे. त्यानंतर अद्यापही मुख्यमंत्री का बोलत नाहीत?", असा सवाल फडणवीस यांनी केला.

"राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. सरकार जेव्हा अडचणीत येतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकांना स्वत: संवाद साधून आश्वस्त करायला हवं असतं. त्यांच्याकडून राज्याची भूमिका स्पष्ट केलं जाणं गरजेचं असतं. पण त्यांनी अद्याप तसं काहीच केलेलं नाही", याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

"गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर स्वाभाविकपणे ते खातं मुख्यमंत्र्यांकडे जातं. सध्या ते खातं राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे सहसा ते खातं राष्ट्रवादीच्या एखाद्या मंत्र्याला दिलं जाईल असं वाटतंय. पण मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ते हे खातं स्वत:कडे ठेवू शकतात. अंतिम निर्णय हा आता मुख्यमंत्र्यांनीच घ्यायचा आहे. पण जो निर्णय घेतील तो लवकत घ्यायला हवा नाही तर कायदा-सुव्यवस्थेचे हाल होतील", असं फडणवीस यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Maharashtra Assembly Election 2024 Results : सांगली जिल्ह्यात ‘मायक्रो प्लॅनिंग’ने भाजपची ‘मविआ’ला धोबीपछाड

SCROLL FOR NEXT