Devendra Fadnavis Google
मुंबई

'रुग्णसेवेपेक्षा सुशोभीकरण करून मलिदा कसा खायचा एवढंच ठाकरे सरकारच काम'

मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये पॅरासिटोमोलही बाहेरून घ्यावा लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील आरोग्य सेवेचा खर्च वाढत आहे. त्यामुळे हा खर्च लोकांना परवडणारा नाही. अधिवेशनात आम्ही सरकार आणि मुंबई महापालिका (BMC) दवाखान्याची परिस्थिती पाहिली आहे. महापालिका मागील वर्षात एकही औषध विकत घेऊ शकलेली नाही. रुग्ण सेवेवर खर्च करण्यापेक्षा सुशोभीकरणावर खर्च करून मलिदा कसा खाता येईल यासाठी ठाकरे सरकार काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. मुंबई अभियान व शिव कल्याण केंद्रद्वारा सुरू करण्यात आलेल्या ‘चालता फिरता दवाखान्याचा’ लोकार्पण सोहळ्यात आज ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, मुंबईतील (Mumbai) जे जे रुग्णालयामध्ये पॅरासिटोमोलही बाहेरून घ्यावा लागत आहे. या गैरसोयीमुळे सामान्य माणसाची मात्र परवड होत आहे. रुग्ण सेवेवर खर्च करण्यापेक्षा सुशोभीकरनावर खर्च करून मलिदा कसा खाता येईल याकडे ठाकरे सरकारचे लक्ष आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनाही या महापालिका रुग्णालयात वापरली जात नाही. गरिबांना कोणताही फायदा या सरकारच्या काळात झालेला नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारची परिस्थिती असतानाही त्यांनी यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. केंद्राच्या सर्व योजना तिथे पोहचत आहेत. भाजपने गावागावात प्रसिद्ध आरोग्य दूत तयार करण्याचे काम केले आहे. 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी (PM Modi) प्रेरणा देणारी वक्तव्य केली त्यातून प्रसाद लाड यांनी प्रेरणा घेतली आहे. सरकार चालत किंवा बोलत नाही आणि हलतही नाही त्यामुळं असे चालते दवाखाने सुरू करावे लागत असल्याचे आमदार भातखळकर यांनी सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत चालता फिरता दवाखान्याचा उपक्रम सुरू होत आहे. दक्षिण मध्य मुंबईत ही व्हॅन रोज पेशंट तपासणीसाठी जाणार आहे. चांगले प्रशिक्षित डॉक्टरही यासोबत जाणार आहेत. आलेल्या पेशंटना औषध देतील आणि लोकांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा पोचवण्याचे काम होणार आहे. रुग्ण सेवेचे महत्व आपण पाहिले आहे. कोविड काळात मुंबईत एकाच बेडवर पेंशट आणि रुग्ण आपण पाहिले आहेत, त्यामुळे हा उपक्रम राबवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT