पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युरोपीय देशांच्या नाकावर टिच्चून रशियाकडून तेल घेतलं, असं म्हणत भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. मोदी सरकारमध्ये आल्यानंतर प्रत्येक गरीबाला वाटू लागलं हे माझं सरकार आहे. सगळा देश माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, असा व्यापक विचार करत मोदींनी काम केलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis praising Narendra Modi)
भाजपा नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे (BJP Leaders meeting in Mumbai). या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, "संपूर्ण बहुमताचं सरकार आल्यावर एखादा नेता काय करू शकतो हे मोदींनी दाखवून दिलं. कितीही टीका झाली तरी त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. सामान्य माणसाचं सबलीकरण करणं, त्याला शक्ती देणं हे काम मोदींनी केलं. गरीबाला वाटू लागलं हे माझं सरकार आहे. माझे पंतप्रधान, माझ्यासाठी विचार करणारे पंतप्रधान, असं गरीबाला पहिल्यांदाच वाटलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी इतकं सिमीत नाही, तर सगळा देश माझं कुटुंब माझी जबाबदारी असा व्यापक विचार करत मोदींनी काम केलं".
जगाच्या पाठीवर कोरोनानंतर आणि रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर मोठं संकट निर्माण झालंय. महागाई भाववाढ जगभरात झालीये. त्याचवेळी याबद्दल ठोस उपाययोजना करणारा भारत देश. युद्धामुळे अनेक युरोपीय देश आखाती देशाकडून तेल घेतील, ते महाग होईल, हे कळल्यानंतर आपण तात्काळ रशियाकडून तेल घेण्याचा निर्णय़ घेतला, अनेक देशांनी दबाव आणला, अमेरिकेनेही आणला.
तेव्हा आपले परराष्ट्र मंत्री म्हणतात की तुमचे युरोपातले सगळे देश मिळून जेवढं ऑईल वापरतात, तेवढं आम्ही वर्षभर पुरवतो. तुम्ही जर तिथून घेऊ शकता तर आम्ही का घेऊ शकत नाही? आम्ही ते तेल घेणार, आम्ही आमच्या देशाचं हित लक्षात घेणार आणि स्वस्तात तेल घेणार. असं सांगत आपण त्यांच्या नाकावर टिच्चून रशियाकडून तेल खरेदी केली. महाग तेल विकत घेतलं असतं तर आज महागाई किती वाढली असती. २ लाख २० कोटी रुपयांचं नुकसान सहन करून केंद्राने या आंतरराष्ट्रीय संकटातूनही देशाला दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.