Versova Beach boat capsized ESakal
मुंबई

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान बोट उलटली; १० ते १२ जण पाण्यात पडले, पाहा थरारक व्हिडिओ

Vrushal Karmarkar

मुंबईतील वर्सोवा चौपाटीवर गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी अपघात झाला. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अंधेरीचा राजा रविवारी सकाळी अकराच्या सुमारास गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी वर्सोवा चौपाटीवर पोहोचला होता. विसर्जनाच्या वेळी अचानक बोट उलटली, त्यामुळे बोटीवरील अनेक जण समुद्रात पडले.

अपघातानंतर काही लोक सुरक्षित पोहत पाण्यातून बाहेर आले. आजूबाजूच्या कोळी समाजाच्या लोकांनी काहींना छोट्या होडीतून सुखरूप बाहेर काढले. समुद्रात पडल्याने अनेकांच्या पोटात पाणी भरले, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत १० ते १२ जण पाण्यात पडले होते. पाण्यात पडलेल्यांना वाचवण्यासाठी प्रत्यक्षदर्शी आणि इतर उपस्थितांनी तातडीने धाव घेतली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकांना आणि गणेशमूर्तींना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याची दिसत आहे. अनेक जण सुरक्षित पोहण्याचा प्रयत्न करत होते. परंतु इतर बोटी लोकांना वाचवण्यासाठी पुढे येत आहेत. तर काही लोक स्वत:ला वाचवण्यासाठी मूर्तीच्या पायाचा आधार घेताना दिसत आहेत.

घटनेमुळे घबराट आणि गोंधळ असतानाही, स्थानिक मच्छीमार, तटरक्षक दल आणि इतरांच्या जलद बचाव प्रयत्नांमुळे कोणतीही जीवितहानी टळली. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसह सर्व प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले. बोट उलटण्याचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु सोशल मीडियावर समोर येत असलेल्या व्हिडिओवरून बोट ओव्हरलोड झाली असावी किंवा मोठी लाटा आली असावी. यामुळे बोच उलटल्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

Local Update: गोरेगाव-कांदिवली लाईनवर काम; 23 आणि 24 सप्टेंबरला 6.5 तासांचा ब्लॉक, काही गाड्या रद्द

Politics: विधानसभेआधी शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, अजितदादांचं टेन्शन वाढणार!

मजुराच्या पोटी जन्म, मेहनतीने राजकारणात नाव कमावलं, आता बनले श्रीलंकेचे राष्ट्रपती, कोण आहेत अनुरा कुमारा दिसानायके?

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

SCROLL FOR NEXT