मुंबई

डेक्‍सामिथाझोन कोरोनावर प्रभावी पण विनाकारण डेक्‍सामिथाझोन  घ्याल तर..., वैज्ञानिक म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : डेक्‍सामिथाझोन कोरोनावर प्रभावी ठरत असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी हे औषध घेण्यास सुरुवात केली. परंतु, या औषधामुळे कोरोना विषाणूची वाढ थांबत नाहीत आणि ते नष्ट होत नाहीत. या जीवरक्षक औषधाचा विनाकारण त्याचा वापर केल्यास जिवावरही बेतू शकते, असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत.

डेक्‍सामिथाझोन हे औषध अनेक दशकांपासून विविध आजारांमुळे शरीरात होणारा दाह कमी करण्यासाठी वापरले जाते. कोरोनाच्या विषाणूमुळे श्‍वसननलिका, फुफ्फुसाचा दाह झाल्यास या औषधाचा वापर केला जातो. त्यामुळे दाह कमी होतो. देशात आणि राज्यातही कोव्हिड रुग्णांमधील दाह कमी करण्यासाठी हे औषध वापरले जात आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

दमेकऱ्यांना खूप दम लागल्यास, एखादी गंभीर ॲलर्जी उद्भवल्यास, संधिवातात सांधे सुजल्यास डेक्सामिथाझोन औषध पूर्वीपासूनच वापरले जाते. हे औषध जीवरक्षक आहे; मात्र विनाकारण वापरल्यास अनेक साईड इफेक्‍ट होतात, असेही डॉ. भोंडवे म्हणाले. हे औषध कसे सुरू करावे व कसे थांबवावे, याचे शास्त्र आहे. त्यानुसार डोस ठरवले जातात. परस्पर औषधे घेणे घातक आहे. काही नागरिकांनी हे औषध स्वत: घेतल्याचे प्रकार लक्षात आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.

कशासाठी वापर?

वेगवेगळ्या आजारांमध्ये शरीरातील अंतर्गत अवयवांचा दाह झाल्यास म्हणजे रक्तवाहिन्या, श्‍वसननलिका अशा अवयवांना सूज आल्यास डेक्सामिथाझोनचा वापर केला जातो. कोरोनाबाधितांमध्ये श्‍वसननलिका, फुफ्फुसांचा दाह होतो. हा दाह कमी करण्यासाठी हे औषध वापरले जाते.

हे आहेत साईड इफेक्‍ट

ॲसिडिटी वाढणे, जठराचा अल्सर होणे, हाडे ठिसूळ होणे, रक्तातील साखर वाढणे, मधुमेह होणे.

dexamethasone is effective on covid19 but check what happens if these medicine is taken unnecessarily

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT