Dharavi Mosque ESakal
मुंबई

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Dharavi Mosque News: धारावी येथील मशिदीमध्ये बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप आहे. बेकायदा बांधकामाची माहिती मिळताच बीएमसी ते पाडण्यासाठी पोहोचले, त्यामुळे परिसरात तणाव पसरला. चर्चेनंतर बीएमसीची टीम परतली असून कारवाई तूर्तास रद्द करण्यात आली आहे.

Vrushal Karmarkar

Dharavi Mosque Update: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मशीद पाडल्याच्या आरोपावरून येथे वाद निर्माण झाला. या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या बीएमसीची टीम तेथून रवाना झाली आहे.

याप्रकरणी पालिकेने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मशिदीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी मुस्लीम समुदाय न्यायालयात धाव घेणार आहे. त्याचवेळी स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.

धारावीचे रहिवासी समरुद्दीन शेख म्हणाले, "मी धारावीत जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो, ज्या इमारतीला बीएमसी आणि इतर अधिकारी बेकायदेशीर म्हणत आहेत, ती एका दिवसात बांधली गेली नव्हती. बांधायला अनेक दिवस आणि महिने लागले, मग अधिकारी कुठे होते? आज ते संरचनेला मशिदीचे स्वरूप आले आहे, त्यामुळे आता ते मशीद पाडणार असल्याचे सांगत आहेत.

मुंबईतील धारावी येथील मेहबूब सुभानी मशिदीचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत बीएमसी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ही मशीद खूप जुनी असल्याचे येथील लोक सांगतात. अशा स्थितीत मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे अधिकारी पोहोचले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: कंपनीच्या मालकाने राजीनामा देताच शेअर्समध्ये तुफान वाढ; गुंतवणूकदार झाले मालामाल, नेमकं काय घडलं?

परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात? मतदारांना गोंजारण्यासाठी घेतल्या बैठका, कोण ठरणार वरचढ?

Accident : भरधाव इको कारची ट्रकला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्याआधी भारतीय संघातील सराव सामना का महत्त्वाचा? कोचनेच केला खुलासा

SCROLL FOR NEXT