dharavi redevelopment project-Eknath Shinde government will ask central government for 283 acres of land for gautam Adani- Sakal
मुंबई

Dharavi Redevelopment: ठाकरेंना नाकारलं, शिंदेंना देणार का?; अदानींच्या धारावी प्रोजक्टसाठी राज्याची केंद्राकडे मोठी मागणी

Sandip Kapde

Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मुंबईतील २८३ एकर मिठागर जमीन मागण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या मालकीची मिठागर जमीन कांजूरमार्ग, वडाळा आणि भांडुप दरम्यान पसरलेली आहे. प्रस्तावाला केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर ही जमीन अदानी रियल्टीकडे सुपूर्द केली जाईल. ही जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) हाती घेत आहे, ज्याद्वारे धारावीतील अपात्र झोपडपट्टी रहिवाशांसाठी भाड्याने घरे बांधण्याची योजना आहे.

“धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत घरे देण्यासाठी जमीन आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईतील चार मिठागरांची २८३ एकर जमीन संपादित करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाईल ,” असे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मेट्रो कार शेड आरे ते कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सरकारने मेट्रो कार डेपोची जागा म्हणून जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न सुरु होता. दरम्यान केंद्र सरकारने मात्र कांजूरमार्ग मिठागर जमिनीवर हक्क सांगितला होता. त्यानंतर कांजूरमार्ग मिठागर जमिनीचा १०२ एकरचा भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित करण्याच्या आदेशालाही न्यायालयाने स्थगिती दिली होती.

इंडीय एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारकडे मुंबईतील चार वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास २८३ एकर मिठागर जमीन आहे. आर्थर सॉल्ट वर्क्स जमीन (१२०.५ एकर), जेनकिन्स सॉल्ट वर्क्स जमीन (७६.९ एकर), जामस्प सॉल्ट वर्क्स जमीन (५८.५ एकर) , आणि आगर सुलेमानशाह जमीन (२७.५.5 एकर.). दरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर ही २८३-एकर मिठागर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कांजूरमार्ग आणि भांडुपच्या ज्या भागात मेट्रो कारशेड प्रस्तावित करण्यात आले होते. त्याच भागात मिठागर जमिनी आहेत. कांजूरमार्ग, भांडुप आणि मुलुंडमधील धारावी रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी डीआरपी या जमिनीचा वापर करेल, अशी माहिती मिळाली आहे.  

केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित केल्यानंतर, राज्य सरकार स्पेशल पर्पज कंपनी (SPV) कडून जमिनीची बाजारभाव वसूल करेल. राज्याने यापूर्वी म्हटले आहे की धारावीतील जे रहिवासी पुनर्वसनासाठी अपात्र आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग प्रकल्पांमध्ये निवास देण्यात येईल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT