Aaditya Thackeray Disha Salian Sakal
मुंबई

Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवा ट्विस्ट; आता कुटुंबीय म्हणतात..

सकाळ डिजिटल टीम

Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दिशा सालियानच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दिशाघरी मुंबई पोलिसांची टीम दाखल झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिशाच्या कुटुंबियांना देखील तिच्या मृत्यूबाबत संशय असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यासाठी तिच्या कुटुंबियांनी योग्य चौकशी करुन सत्य समोर आणण्याची विनंती यावेळी पोलिसांना केली आहे. आतापर्यंत दिशाने आत्महत्याच केली असल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. पण आता सातत्याने जे पुरावे किंवा आरोप करण्यात येत आहेत, त्यामुळे तिच्या कुटुंबियांना देखील संशय निर्माण झाला आहे.

दिशाच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांना निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पूर्वी दिशाने आत्महत्याच केली असल्याचा जबाब तिच्या कुटुंबियांनी दिला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी दिशा सालियनची केस बंद केली होती.

पण आता तिच्या कुटुंबियांनी देखील संशय निर्माण केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणात एसआयटी चौकशी स्थापन देखील झाली. पण या एसआयटी चौकशीच्या सुरुवातीलाच कुटुंबियांनी धक्कायदाक खुलासा केला आहे.

थोडक्यात प्रकरण

मुंबईत एका कंपनीत टॅलेंट मॅनेजर म्हणून कार्यरत दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती.

या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यानंतर दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसंनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मी बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण...; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Bigg Boss Marathi Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकर 'बिग बॉस'च्या घराबाहेर; टॉप 6 सदस्य झाले निश्चित

Marathi Language: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नेमकं काय फायदा होणार? अभिजात भाषेचे निकष काय असतात? जाणून घ्या

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात! वचनपूर्ती सोहळ्यासाठी ४० हजार महिला लाभार्थी आणण्याचे अधिकाऱ्यांना टार्गेट; तलाठ्यांकडे ‘ही’ जबाबदारी

Marathi language: मराठी भाषा ही भारताचा अभिमान! अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मोदींकडून गौरवोद्गार, वाचा नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT