Bandra Bay Sakal
मुंबई

Mumbai Crime : नवजात अर्भकाच्या मृतदेहाची वांद्रे खाडीत विल्हेवाट; आरोपी माता अटकेत

आपल्या नवजात मुलाचा मृतदेह वांद्रे खाडीत फेकणाऱ्या महिलेसह पुरुषाला वांद्रे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आपल्या नवजात मुलाचा मृतदेह वांद्रे खाडीत फेकणाऱ्या महिलेसह पुरुषाला वांद्रे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गर्भधारणा लपविण्यासाठी महिलेने कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी 34 वर्षीय महिला मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसरात वास्तव्यास होती.

या प्रकरणी आरोपी महिला आणि पुरुषाचे अनैतिक संबंध होते. त्यातून महिलेची गर्भधारणा झाली होती. परंतु महिलेने आपल्या पोटात कर्करोगाची गाठ असल्याचे सांगून तिने आपली गर्भधारणा लपवत होती.

सोमवारी रात्री 9 च्या सुमारास आरोपी महिलेच्या राहत्या ठिकाणी मुलाला जन्म दिला. तिच्या पोटात गाठ फुटल्याचे महिलेने इतरांना सांगत तिने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यानंतर नवजात अर्भकाचा मृतदेह पिशवीत गुंडाळत आरोपी प्रियकराच्या सूचनेनुसार नवजात बालकाचा मृतदेह वांद्रे खाडीत फेकून दिला.

या प्रकरणी शेजाऱ्यांना संशय आल्याने पोलिसाना या प्रकरणी तक्रार करण्यात आली. बुधवारी महिलेची पोलिस चौकशीनंतर तिच्यावर आणि आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT