Thane News: माघी पौर्णिमेला श्री मलंगगडावर मलंग उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रेत दरवर्षी शिवसैनिक अन्नदान करत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करतात.
यावर्षी देखील ठाकरे व शिंदे गटाकडून यात्रेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान ठाकरे गटाचे शिवसैनिक भाविकांना "निष्ठेचा प्रसाद घ्या" असे म्हणत आवाहन करत होते.
ही बाब लक्षात येताच पोलिसांनी कारवाई करत शिवसेना ठाकरे गटाच्या उल्हासनगर व कल्याण येथील शाखाप्रमुखांना ताब्यात घेतले. हिललाईन पोलिसांनी त्यांना कलम 41 नुसार नोटीस बजावली आहे. यामुळे ठाकरे गटात नाराजीचे वातावरण असून ही दडपशाही सुरू असल्याचे बोलले जात आहे.माघ पौर्णिमेला श्री मलंगगड यात्रा उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडावर आरती करण्यात आली
दरवर्षी यात्रेत शिवसैनिक महाप्रसादाचे वाटप करतात. यंदा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गडाच्या पायथ्याशी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
ठाकरे गटाचे शिवसैनिक भाविकांना महाप्रसाद देताना 'निष्ठेचा प्रसाद घ्या' असे आवाहन करत होते. यामुळे याची चर्चा सर्वत्र रंगली होती. अन्नदान करताना केलेल्या विधानाविषयीची माहिती सायंकाळी पोलिसांना समजली.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. त्यानंतर उल्हासनगरचे शाखा प्रमुख सागर कांबळे व कल्याण पश्चिमचे शाखा प्रमुख केदार शेरे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या प्रकाराची माहिती मिळताच ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी श्री मलंगगडाच्या पायथ्याशी धाव घेतली होती. त्यांनी याप्रकरणी चौकशी केली मात्र प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे टाळले. पोलिसांच्या कारवाई नंतर ठाकरे गटाने अन्नदान करणे बंद केले होते.
याविषयी कल्याणचे ठाकरे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख शरद पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, आमच्या शाखा प्रमुखांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ही सर्व दडपशाही सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.