मुंबई

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पासची खैरात; प्रशासकीय कारभार चव्हाट्यावर

प्रवीण चव्हाण : सकाळ वृत्तसेवा


तलासरी : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा असो व अन्य कारणाने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या महाप्रसादाचा पाहुणचार घ्यावा लागला. मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहेरनजर असलेल्या धनाढ्य आणि हितसंबंध जपणाऱ्यांना बनावट अत्यावश्यक सेवा पास देण्यात आल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार तलासरी येथे उघड झाला असून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पासची खैरात वाटण्यात आल्याने प्रशासकीय कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

विशेष म्हणजे सामान्य लेबर पास मिळालेले हे तलासरी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. 16 एप्रिल 2020 ते 30 मे 2020 या कालावधीसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग डहाणू येथील उप अभियंता संजय संकपाळ यांच्या सही शिक्क्यांनीशी सदर पास देण्यात आल्याचे समोर आले आहे. असे कित्येक पास तलासरी तालुक्यात वाहनांवर चिटवून, वाहनात लँमिनेशन करून अनेक जण मिरवत आहेत. सदर बोगस पास बनवणे व त्याचा वापर करणे कायदेशीर गुन्हा असल्याने या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.  


सदर लेबर पास घेतलेल्या व्यक्तीला मी ओळखत नसून नजर चुकीने मान्सूनपूर्व कामे उरकून घेण्यासाठी पास देताना चूक  झाली असावी. सदर पास तातडीने जमा करून घेण्यात आले आहेत.
- संजय संकपाळ, उप अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

Ajit Pawar: विलासराव देशमुख हे उत्तम मुख्यमंत्री! आता CM पदाच्या शर्यतीत आहात का? अजित पवारांनी स्पष्ट केले मत

Chole Pattice Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार छोले पॅटिस, वीकेंडचा आनंद होईल द्विगुणित

तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड म्हमद्याचा गोळीबार आर्थिक वादातून; दोन तासांत आवळल्या चौघांच्या मुसक्या

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

SCROLL FOR NEXT