Navi mumbai sakal
मुंबई

BMC Bonus : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठ गिफ्ट! 29 हजार रुपये बोनस जाहीर

Amit Ujagare (अमित उजागरे)

BMC Bonus : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. त्यानुसार, दिवाळीचा २९ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी पेक्षा ३ हजार रुपये वाढीव बोनस देण्यात आला आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आचारसंहितेपूर्वीच मोठा निर्णय

राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वीच राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. कारण या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आचारसंहिता लागू होणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळी बोनस देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं मागणी केली होती. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं देखील पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. BMC Bonus Latest Marathi News

कोणाला किती मिळणार बोनस?

१. महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी : 29000 रुपये बोनस

२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी : 29000 रुपये बोनस

३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक : 29000 रुपये बोनस

४. माध्यमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित) : 29000 रुपये बोनस

५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) : 29000 रुपये बोनस

६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते/ शिक्षकेतर कर्मचारी - (अनुदानित/विनाअनुदानित) : 29000 रुपये बोनस

७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) : 29000 रुपये बोनस

८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) : 12000 रुपये भाऊबीज भेट

९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस : 5000 रुपये भाऊबीज भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

Baba Siddique : म्हणून शाहरुख बाबा सिद्दिकीच्या अंत्यसंस्काराला राहिला गैरहजर ; जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाने वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

SCROLL FOR NEXT