मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने राज्यभरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे न्यायालयीन कामे वाढवून पोलिसांवरील ताण अधिक वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
तुरुंगांतील आरोपींनी तातडीचे नसल्यास जामिनासाठी अर्ज करू नयेत. संपूर्ण देश मोठ्या संकटाचा सामना करत असताना कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे कर्तव्य पोलिस चोखपणे बजावत आहेत. संचारबंदी असूनही एकट्याने व समूहाने रस्त्यांवर फिरणाऱ्यांना समज देण्यासाठी पोलिसांना खबरदारी आणि संयमाने वागावे लागत आहे. कायदा-सुव्यवस्था राखताना त्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. अशा काळात जामीन अर्ज दाखल करून पोलिसांना कामाचा आणखी ताण देऊ नका, अशी सूचना न्या. ए. एम. बदर यांनी केली.
फसवणुकीच्या आरोपात अटकेत असलेल्या सोपान लांजेकर याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. सध्या बाहेरची परिस्थिती कठीण असून, जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुरुंगातून सोडल्यावर कैदी आपल्या गावात कसे जाणार, हा प्रश्न आहे. या स्थितीत त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आरोपीने तुरुंगात राहणेच योग्य आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आणि त्याच्या अर्जावरील सुनावणी तहकूब केली.
मोठी बातमी - मुंबईतील सिल केलेल्या भागांमधला कचरा असणार बायोमेडिकल वेस्ट, वेगळ्या पद्धतीनं लावली जाणार विल्हेवाट
फिल्डवर उपस्थिती हवी
रुग्णालय कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. लॉकडाऊन असताना सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची 100 टक्के उपस्थिती फिल्डवर असली पाहिजे. त्यांनी न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. याची नोंद आरोपींनीही घ्यायला हवी. माहिती देण्यासाठी पोलिस न्यायालयात हजर राहू शकत नाहीत. लॉकडाऊनच्या काळात जामीन मंजूर करणे तातडीच्या प्रकरणांत येत नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. लॉकडाऊनदरम्यान केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होईल, असे निर्देश न्यायालय प्रशासनाने यापूर्वीच दिले आहेत.
do not increase unwanted stress on police force says mumbai high
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.