मुंबई : संपूर्ण भारत कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात तब्बल ११ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२ वरून ६३ वर पोहोचला आहे. त्यातच आता राज्याचे आरोग्य मंत्री यांनी जनतेला AC चा वापर न करण्याचं आवाहन केलं आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री:
काय सांगतात आतापर्यंतचे आकडे:
मुंबईत कोरोनाचे नवीन १० नवीन रुग्ण आढळले आहेत तसंच १ जण पुण्यात आढळला आहे. मुंबईत विदेशातून आलेले ८ रूग्ण आहेत तर त्यांच्या संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात ११ रुग्णांची वाढ झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत आढळलेल्या ६३ रुग्णांपैकी १२ ते १४ जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर काही कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच सतर्क राहण्याची गरज आहे.
Do not use AC at offices or at home said state health minister read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.