doctor positive 
मुंबई

कोरोना योद्धेही कोरोनाच्या विळख्यात, कुटूंबियांनाही लागण

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराशी मुकाबला करण्यासाठी ठाणे शहरात सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या जोडीला खासगी डॉक्‍टरांची टीमही या युद्धात सहभागी झाली आहे. बाधित रुग्णांना जीवनाची नवी आशा मिळवून देण्याचे काम डॉक्‍टर्स आणि कर्मचारी करीत आहेत. मात्र ही सेवा बजावत असताना या कोरोना योद्‌ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होत आहे. सेवा बजावणाऱ्या सहा डॉक्‍टरांचा व तीन डॉक्‍टरांच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. 

शहरात बाधित झालेल्यांची संख्या 17 हजार 446 इतकी असून 594 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे; तर 11 हजार 78 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता, बाधितांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्‍टरांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून या युद्धात सरकारी डॉक्‍टरांच्या जोडीला खासगी डॉक्‍टरांचे पथक सहभागी झाले. मात्र, यावेळी कोरोनाबाधित रुग्णांनावर प्रत्यक्ष उपचार करीत असताना, नकळतपणे कोरोनाने अनेक डॉक्‍टरांना आपल्या विळख्यात घेतले. अनेक डॉक्‍टरांमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील या संसर्गाची लागण झाल्याचे दिसून आले. यामध्ये अनेक डॉक्‍टरांसह त्यांच्या घरातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. 

आतापर्यंत 150 डॉक्‍टरांना लागण 
ठाणे शहरात कोरोनाच्या लढ्यात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर संस्थेच्या माध्यमातून चार हजार खासगी डॉक्‍टर कोरोनाच्या युद्धात सहभागी झाले आहेत. त्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत असताना 150 डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 6 डॉक्‍टरांची प्राण ज्योत मालवली. दुसरीकडे याच आजाराने योद्‌ध्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील संसर्ग होऊन त्यांना लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन फिजिशियन आणि एका भूलतज्ज्ञ डॉक्‍टरांच्या आई-वडिलांचा समावेश असून त्यांचे प्राण वाचविण्यात त्यांना अपयश आले असून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सरकारी डॉक्‍टरांच्या जोडीला खासगी डॉक्‍टर देखील या युद्धात सहभागी झाले आहे. या युद्धात लढत असताना अनेक डॉक्‍टरांनाही त्याची लागण झाली असून सहा डॉक्‍टरांचा, तर तीन डॉक्‍टरांच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांना देखील सरकारी डॉक्‍टर, पोलिस यांच्याप्रमाणे 50 लाखांचे विमा कवच मिळावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 
- डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे. 

doctors also corona positive patient in thane read full story

(संपादन : वैभव गाटे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT