doctor 
मुंबई

बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचा संघर्ष

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : लॉकडाऊनमुळे रुग्णालयातील कर्मचारीही रजेवर... रस्तेही निर्मनुष्य... ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त... वेळेवर कोणतेही वाहन उपलब्ध नसताना एका नवजात बाळाला जन्मानंतर डॉक्‍टरांच्या अथक प्रयत्नाने जीवदान मिळाले. जन्मानंतर दहाव्या मिनिटानंतर बाळाला डॉक्‍टरांनी दुचाकीवरून दुसऱ्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. मन हेलावून टाकणारी डॉक्‍टरांच्या संघर्षाची घटना घडली बुधवारी (ता. 8) अलिबागमध्ये. डॉक्‍टरांच्या प्रयत्नाने बाळ आणि आई यांची प्रकृती ठणठणीत आहे. 

अलिबाग शहरातील 32 वर्षीय श्‍वेता केतन पाटील यांना मंगळवारी (ता. 7) रात्री अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने डॉ. चंद्रकांत वाजे नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यांना मधुमेहाचा त्रास होता; मात्र त्यांची औषधं नियमितपणे सुरू असल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात होते, परंतु त्यांचे अगोदरचे (पहिले) बाळ प्रसूतीनंतर काही कारणास्तव दुसऱ्या दिवशीच दगावले होते. गरोदरपणाचे नऊ महिने श्‍वेता यांना पूर्ण न झाल्याने आणि या वेळीही पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत असल्याने डॉ. वाजे यांनी श्‍वेता यांचे तातडीने सिझेरिन करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. वाजे यांनी बाळाची नाजूक परिस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनाही पाचारण केले. बुधवारी सकाळी श्‍वेता यांची यशस्वी प्रसूती झाली. बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती सुरुवातीला चांगली होती. नुकतेच जन्माला आलेले बाळ रडलेही; मात्र थोड्याच वेळात बाळाला श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर असल्याने बाळाला तातडीने अतिदक्षता विभागात नेण्याची गरज होती. ती सुविधा डॉ. वाजे यांच्याकडे नसल्याने आपल्या रुग्णालयात बाळाला हलवण्याचा निर्णय बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी घेतला; मात्र खरे आव्हान पुढे होते. 

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद, रस्त्यावर कुठलेही वाहन नाही. अशा बिकट परिस्थितीत बाळाची खालावत चाललेली प्रकृती पाहून डॉ. चांदोरकरांनी बाळ व बाळाची मावशी (जी परिचारिका आहे) यांना आपल्याच दुचाकीवर बसवून त्यांच्या आनंदी हॉस्पिटलमध्ये आणले आणि तातडीने योग्य ते उपचार सुरू केले. डॉ. वाजे, डॉ. चांदोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयाने बाळाची प्रकृती उत्तम आहे. 

बाळ श्‍वास घेत नसल्याने बाळाला अतिदक्षता कक्षात नेणे गरजेचे होते. लॉकडाऊनमुळे वेळेवर कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने आणि बाळाची प्रकृती खालावत असल्याने आम्ही दुचाकीवरूनच माझ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. 
- डॉ. राजेंद्र चांदोरकर, बालरोगतज्ज्ञ. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात रेवंत रेड्डीचं तेलगू भाषेत भाषण; मोदींवर केली टीका

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT