डोंबिवली : शहरातील विविध कामांविषयी (city developments) आज आयुक्तांसोबत चर्चा झाली. या कामांचा अनुपालन अहवाल (compliance report) येत्या सात दिवसांत दिला नाही तर, येत्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) सरकारला धारेवर (mva government) धरण्याचा इशारा भाजपा आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी दिला. डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामासाठी (Dombivali Road works) 472 कोटी कोटी शिवसेना खासकरून पालकमंत्री आजही देत नाही, ही दुर्भाग्यपूर्ण बाब असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डोंबिवली चे भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी आधीचे प्रलंबित आणि नव्याने काही विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील रस्ते, उड्डाणपूलाची कामे, काही मागण्या याविषयावर आमदारांनी चर्चा केली. याविषयी ते म्हणाले, ज्या कामांविषयी आयुक्तां सोबत चर्चा झाली त्याचा अनुपालन अहवाल येत्या 7 दिवसांत देण्याची मागणी केली आहे. हा अहवाल दिला गेला नाही तर येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यात येईल. गेल्या वेळीही भेट झाली तेव्हा अनुपालन अहवालाची मागणी केली होती. मात्र तो देण्यात आला नव्हता.
दिलेल्या कालावधीत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटत राहणार हे आयुक्तांना सांगण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांच्या कामाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले शहरातील रस्ते चांगले व्हावे असे युती सरकारच्या काळात आम्हाला वाटायचे. पण गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून विशेषकरून पालकमंत्र्यांकडून डोंबिवली तील रस्त्यांसाठी 472 कोटी दिले जात नाहीत ही दुर्भाग्याची बाब असल्याचेही आमदार चव्हान यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.