culprit arrested sakal media
मुंबई

डोंबिवली : दोन सराईत मोटारसायकल चोर अटकेत

जळगाव वरून विष्णुनगर पोलिसांनी चोरट्यास केली अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मोटारसायकल चोरणाऱ्या (bike robbery) दोन सराईत चोरट्यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक (Two thief arrested) केली आहे. सीसीटीव्ही फुटेज (cctv footage) आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे एकास जळगाव येथुन तर दुसऱ्या चोरट्यास कल्याणमधून (kalyan) अटक करण्यात आली. दिलीप शांताराम पाटील (25) आणि रोहित अविनाश यादव (31) अशी अटक आरोपींची नावे असून त्याच्याकडूम चोरीस गेलेल्या 9 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवर उभी केलेली एक मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना 4 नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये दोन व्यक्ती चोरी केलेली मोटारसायकल ढकलून घेत जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार विष्णूनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे, पोलीस शिपाई भामरे, पोलीस हवालदार पाटणकर, पोलीस नाईक सांगळे, लोखंडे, मीसाल, कांगुणे यांच्या पथकाने गुप्त बातमीदार मार्फत चोरटा दिलीप पाटील यांची माहिती मिळवली.

तांत्रिक विश्लेषण आधारे तपास केला असता दिलीप सतत ठिकाण बदलत होता. शेवटी त्याचा मोबाईल बंद असताना जळगाव मधील परोळा येथून दिलीपला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दुसरा चोरटा रोहित यादव याचा मग काढत त्याला कल्याण पूर्व चिंचपाडा येथून अटक करण्यात आली. पोलिस तपासात दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या एकूण 9 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामध्ये विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 6 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. तर रोहित याचा दिलीप ओबत एकाच गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT