jewellery sakal
मुंबई

Dombivali Crime : महिलांनी बनावट दागिने देऊन सराफाला 11 लाखाला फसविले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - सराफाच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनी त्यांना बनावट दागिने देऊन त्याबदल्यात 10 लाख 71 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. पंकज महेंद्र शंकलेशा (वय 38) असे फसवणूक झालेल्या सराफाचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज शंकलेशा यांची डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील साई आर्केड सोसायटीत सोन्याची पेढी आहे. गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी महिला ग्राहक म्हणून पंकज यांच्या दुकानात आल्या. त्यांनी आपल्याकडे काही दागिने आहेत. ते दागिने देऊन त्या बदल्यात अन्य कलाकुसरीचे दागिने खरेदी करायचे आहेत असे जवाहिर पंकज आणि त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांंना सांगितले.

दागिने खरेदी करत असताना या तीन महिलांनी हालचलाखी करत कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत दागिन्यांची पारख करत होत्या. या महिलांनी स्वताकडील बनावट दागिने दुकानदाराला देऊन त्या बदल्यात 10 लाख 71 हजार रूपयांचे दागिने खरेदी केले.

या महिला दागिने खरेदी करून गेल्यानंतर दुकानदार शंकलेशा यांना संशय आला. त्यांनी दागिन्यांची पारख करून घेतली तर ते बनावट असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात तीन महिलांविरूध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT