ring sakal
मुंबई

Dombivali News : नवऱ्या मुलाची हरवलेली अंगठी लग्नाच्या आदल्या दिवशी सापडली

बहिणीचे लग्न असल्याने होणाऱ्या भावोजीसाठी सोन्याची अंगठी आणि घड्याळ भावाने मोठ्या हौसेने खरेदी केले.

शर्मिला वाळुंज

बहिणीचे लग्न असल्याने होणाऱ्या भावोजीसाठी सोन्याची अंगठी आणि घड्याळ भावाने मोठ्या हौसेने खरेदी केले.

डोंबिवली - बहिणीचे लग्न असल्याने होणाऱ्या भावोजीसाठी सोन्याची अंगठी आणि घड्याळ भावाने मोठ्या हौसेने खरेदी केले. घरी गेल्यावर मात्र सोन्याची अंगठी असलेली पिशवीच नसल्याने भावाच्या पायाखालची जमीन हादरली. भावाला काय करावे सुचत नसतानाच डोंबिवलीतील एका प्रामाणिक ज्येष्ठ नागरिकाने रस्त्यावर सापडलेली सोन्याची अंगठी व घड्याळ हरवलेल्या व्यक्तीला परत दिले. लग्नाच्या आदल्या दिवशीच अंगठी आणि घड्याळ परत मिळाल्याने भावाच्या जिवात जीव आला असून त्यांच्या घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.

कल्याण डोंबिवली शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून दुसरीकडे हरविलेल्या वस्तू प्रामाणिकपणे परत करणाऱ्या चांगल्या नागरिकांचेही दर्शन डोंबिवलीत घडत आहे. अशीच एक घटना नुकतीच डोंबिवलीत उघडकीस आली आहे. सागांव येथे राहणारे हरिश विश्वकर्मा यांची बहिण मनिषा हिचे लग्न असल्याने त्यांनी भावोजींसाठी सोन्याची अंगठी व घड्याळ घेतले होते. खरेदी करुन ते पत्नी पूजा हिच्यासह दुचाकीवरुन घरी परतत असताना पी अॅण्ड टी कॉलनी परिसरातून ते जात होते. यावेळी हनुमान मंदिरा जवळून ते जात असताना त्यांच्या हातातून सोन्याची अंगठी असलेली पिशवी रस्त्यावर पडली. ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही.

दुचाकीवरुन पिशवी पडल्याचे मंदिर परिसरात बसलेले गांधी नगर येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक मधुकर पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या हरिश यांना आवाज दिला परंतू ते निघून गेल्याने मधुकर यांनी पिशवी हातात घेऊन पाहिले असता त्यात घड्याळ आणि अंगठी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकीस्वार परत येतील असे त्यांना वाटले. मात्र दुचाकीवरील व्यक्ती परत न आल्याने त्यांनी पिशवित सदर व्यक्तीस संपर्क साधण्यासाठी काही माहिती मिळते का पाहीले. यावेळी सोन्याची अंगठी खरेदी केल्याची पावती होती. त्या पावतीवर हरिश यांचे नाव व संपर्क क्रमांक होता. दोन दिवस एका कार्यक्रमाच्या गडबडीत असणाऱ्या पवारांनी मंगळवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी मानपाडा पोलीस ठाण्यात ही पिशवी नेऊन देत पोलीसांना याची माहिती दिली.

मानपाडा पोलिस ठाण्यात उपस्थित असलेले डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पावतीवर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधत घडलेली हकीकत हरीश यांना सांगितली. त्यानंतर काही वेळातच हरीश पत्नीसह मानपाडा पोलीस ठाण्यात पोहचले आणि पवारांच्या हस्ते ही अंगठी व घडयाळ असलेली पिशवी पुन्हा हरिशच्या हातात दिली. यावेळी हरिशने बुधवारी आपल्या बहिणीचे लग्न असल्याचे सांगत बहिणीच्या लग्नाच्या गडबडीत असल्याने त्यावेळी पिशवी हातातून कोठे पडली हे समजत नव्हते. आम्हाला खूपच टेन्शन आले होते. पण अंगठी व घड्याळ सापडल्याने समाधान व्यक्त करत पोलीस आणि मधुकर पवार यांचे आभार त्यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT