hawkers into the women's compartment sakal
मुंबई

Hawkers : महिला डब्यात फेरीवाल्यांची घुसखोरी सुरूच

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते दादर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान महिला डब्यातील फेरिवाल्यांची घुसखोरी वाढू लागली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते दादर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान महिला डब्यातील फेरिवाल्यांची घुसखोरी वाढू लागली आहे. सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत देखील हे फेरिवाले महिलांच्या डब्यात शिरत असल्याने महिला प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याविषयी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे महिला तक्रारी करतात परंतू त्यांचाही धाक या फेरिवाल्यांना नसल्याचे दिसून येत आहे.

रेल्वे स्थानकावर फेरीवाल्यांचा वावर असतो शिवाय हे फेरीवाले डब्यात देखील शिरुन व्यवसाय करतात. महिलांच्या डब्यात यांचा सर्वाधिक वावर असल्याची बाब निदर्शनास येते. घरातील लहान सहान उपयोगी वस्तू, मुलांची खेळणी, महिलांचे दागिने यांसह खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या फेरिवाल्यांचा यात समावेश असतो.

ही बाब मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून देऊन ही रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले असल्याने महिला प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात असणे आवश्यक असते.

मात्र सकाळच्या वेळी हे जवान स्थानकांवर दिसून येत नाहीत. याप्रकरणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांनी सातत्याने महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात रेल्वेच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्या आहेत. रेल्वे प्रशासन मात्र याची गांर्भियाने दखल घेत नसल्याचे त्या सांगतात.

मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्या समोर अनेक सदस्यांनी फेरिवाल्यांचा विषय उपस्थित केला. त्यावेळी लालवानी यांनी रेल्वे स्थानकावर 1 हजार 925 सीसीटीव्ही आणि रेल्वे सुरक्षा बलांचे जवान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याचे सांगितले. एवढे असताना फेरिवाले डब्यात कसे शिरतात असा प्रश्नच असल्याचे अरगडे सांगतात.

फेरीवाले मोठ्या निळ्या पिशव्यांत आपले सामान बांधून लोकलमध्ये शिरतात लोकलमध्ये शिरल्यानंतर ते सामान बाहेर काढून विक्री केली जाते. हा त्यांचा दिनक्रम सातत्याने सुरु असतो. मग रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना ते दिसत नाही का ? की जाणून बूजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचेही पोटपाणी आहे ही बाब मान्य.

परंतू त्यांनी गर्दी नसताना प्रवास करावा. त्यांची ओळख रेल्वे प्रशासनाकडे असावी असे काही नियम असावे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनास जाग येते. तेवढ्यापुरती कारवाई होते. परंतू नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे असते. महिलांची सुरक्षितता पाहता काही ठोस उपाययोजना या फेरिवाल्यांची केली जावे अशी मागणी महिला प्रवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT