Concrete road digging sakal
मुंबई

Dombivali News : डोंबिवली एमआयडीसीत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण होण्याआधीच खोदकामास सुरुवात

सिमेंटचा रस्ता झाल्याने खड्ड्यांच्या रस्त्यातून आपली सुटका होईल याचे समाधान येथील स्थानिकांच्या चेहऱ्यावर कोठेतरी उमटू लागले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे. परंतू नविन रस्त्यांचे काम पूर्ण ही झाले नाही तोच या रस्त्यांची तोडफोड सातत्याने सुरु असल्याने या रस्त्यांचा भविष्यात काय दर्जा राखला जाणार असा प्रश्न येथील रहिवाशांना भेडसावू लागला आहे.

रस्त्याखालील सेवा वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने हे रस्ते खोदण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्या एक दोन महिन्यांच्या कालावधीत सहा ते सात वेळा सिमेंटचा नविन रस्ते खोदले गेल्याने रहिवाशांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची गेल्या 30 - 40 वर्षात दुरुस्ती न झाल्याने दुरावस्था झाली आहे. येथील नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून येथील रस्त्यांचे सीमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे.

सिमेंटचा रस्ता झाल्याने खड्ड्यांच्या रस्त्यातून आपली सुटका होईल याचे समाधान येथील स्थानिकांच्या चेहऱ्यावर कोठेतरी उमटू लागले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत नव्याने बांधण्यात आलेला सिमेंटचा रस्ता रस्त्याखालील सेवा वाहिन्या बिघाडामुळे खोदण्यात आला आहे. तब्बल एक दोन नाही तर सहा ते सात वेळा रस्ता खोदण्याचा नामुष्की कंत्राटदारावर आली आहे.

प्रथमच सुरुवातीला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर एका सोसायटीच्या पाण्याची लाईन खराब झाली, दुसऱी घटना सीईटीपी रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत गळती झाली. त्यानंतर मिलापनगर येथील रस्त्याखालील मेन केबल नुकसान पोहोचले होते एका सोसायटीला करण्यात आलेल्या महावितरणच्या केबल मध्ये बिघाड झाल्याने अशा सेवा वाहिन्या खराब झाल्याच्या कारणास्तव हा रस्ता सहा ते सात वेळा खोदण्यात आला.

खोदलेल्या ठिकाणी कॉंक्रीटचा थर टाकून तो पॅच बनविला गेला आहे. मात्र कंत्राटदाराने रस्ता करण्याआधी भूमिगत सेवा वाहिन्यांचे योग्य नियोजन न केल्याने अशा प्रकारे वारंवार रस्ता खोदावा लागला आहे. या खोदकामांमुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

हे रस्ते तयार करण्यापूर्वीच रस्त्याच्या दोन्ही बाजुला सेवा वाहिन्या वाहून नेण्यासाठी स्वतंत्र भुयारी मार्गिका, भुयारी संरक्षित चेंबर (डक्ट) बांधणे आवश्यक होते. यामुळे अशाप्रकारची खोदाई ठेकेदाराला करावी लागली नसती.

महावितरण, एमआयडीसी, सीईटीपी, दूरसंचार विभागाच्या सेवा वाहिन्यांमध्ये काही बिघाड झाले असते तर संबंधित विभागाने रस्ते खोदकाम न करता भुयारी मार्गातील आपल्या वाहिन्या पाहून त्या दुरुस्त केल्या असत्या. अशी कोणती ही पध्दत न वापरता एमएमआरडीएच्या ठेकेदाराने फक्त काँक्रीट रस्त्यांवर लक्ष दिले असल्याचे बोलले जात आहे.

मागील दीड वर्ष या भागातील रहिवासी, उद्योजक, रुग्णालय चालकांनी सीमेंट रस्ते होणार आहेत म्हणून सर्व प्रकारचे त्रास सहन केले. आता काँक्रीट रस्ते झाले तर ते खोदकाम करुन तोडले जाऊन पुन्हा अडथळे उभे केले जात आहेत. याविषयी रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT