Dombivali Traffic Jam sakal
मुंबई

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

डोंबिवली शहरांमध्ये रस्त्यांची ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरणची कामे सुरू असल्याने रस्ते खोदुन ठेवले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली शहरांमध्ये रस्त्यांची ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरणची कामे सुरू असल्याने रस्ते खोदुन ठेवले आहेत. उर्वरित रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्याने वाहने तासभर कोंडीत अडकून पडत आहे.

त्यातच डोंबिवलीत आयोजित दोन मोठ्या गरबा उत्सवांना जाण्यासाठी नागरिक स्टेशन परिसर व इतर मार्गावर गर्दी करत असल्याने गेले तीन दिवसांपासून अभूतपूर्व अशी वाहन कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस बंदोबस्त मध्ये व्यस्त असल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.

डोंबिवलीत कोपर व ठाकुर्ली उड्डाणपूल, मानकोली रस्ता, मोठागाव फाटक रोड, मानपाडा रोड, टंडन रोड, फडके रोड, सावरकर रोड, आगरकर रोड, स्टेशन परिसर, टिळक रोड, सुभाष रोड, महात्मा फुले रोड, उमेश नगर, गणेश चौक, नेहरु रोड, स. वा. जोशी शाळा मार्ग, ठाकुर्ली चोळेगाव रस्ता आदी ठिकाणी वाहन कोंडीची समस्या तीव्र आहे. अरुंद रस्ते, वाहनांची संख्या जास्त यासोबतच रस्त्यांची सुरू असलेली कामे, सेवा वाहिन्या, गटारांची बांधणी आदी विविध कामांमुळे या कोंडीत आणखी भर पडली आहे.

त्यातच डोंबिवली मध्ये भव्य स्वरूपात गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला जाणारे नागरिक स्टेशन परिसरात रिक्षा ची वाट अर्धा रस्ता अडवतात. वाहन मिळत नसल्याने काही नागरिक खासगी वाहने घेऊन बाहेर पडत आहेत. यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात शहरात वाहन कोंडी होत आहे. या कोंडीमध्ये रुग्णवाहिका देखील अडकून पडत आहेत. यामुळे रुग्णांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

सण उत्सवाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे कोणतेही नियोजन केलेले दिसत नाही. राजकीय गरब्याना मात्र पोलीस उपस्थिती लावताना दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT