Building Collapse News
Building Collapse News esakal
मुंबई

Building Collapse : डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारत कोसळली, दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले

संतोष कानडे

डोंबिवलीः डोंबिवली पूर्व येथील जुना आयरे रोड परिसरातील एक धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ही इमारत धोकादायक झाल्याने शुक्रवारी सकाळपासून इमारत खाली करण्यात येत होती.

इमारतीमधील रहिवासी बाहेर पडत असतानाच सायंकाळी 5 च्या आसपास इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली. या इमारतीमध्ये सध्या 2 जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल व पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अरविंद भाटकर (वय 70) व गीता लोढा (वय 54) अशी आत अडकलेल्या नागरीकांची नावे आहेत.

डोंबिवली पूर्वेतील आदिनारायण ही तळमजली अधिक 3 मजली इमारत शुक्रवारी सायंकाळी कोसळली. यामध्ये 37 खोल्या व 7 दुकाने होती. 10 कुटुंब येथे वास्तव्यास होती अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

ही इमारत धोकादायक झाली होती, त्यातच काल इमारतीला क्रॅक गेल्याने केडीएमसी प्रशासनाने ही इमारत खाली करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या होत्या. सकाळी पालिका अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी येऊन नागरिकांना बाहेर काढत होते. सायंकाळी नागरिक आपले सामान घरातून बाहेर काढत असतानाच अचानक इमारतीचा वरील भाग कोसळू लागल्याने सर्वजण बाहेर पळाले.

यात अरविंद हे मात्र इमारतीत अडकले आहेत. ते आजारी असल्याने बेडवर होते. त्यांचा मुलगा सिद्धेश व आई हे बाहेर पडले पण अरविंद आतच अडकले. तर गीता यांना आधीपासून पालिका कर्मचारी बाहेर या असे सांगत होते मात्र त्यांनी दरवाजा बंद करून घेत घरात स्वतःला कोंडल्याने त्या आत अडकल्याची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन दलाच्या 2 गाड्या, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

''या ठिकाणी धोकादायक इमारत खचल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत धोकादायक झाल्याने पालिका प्रशासनाच्या वतीने त्यांना नोटीस देण्यात आली होती. तसेच शुक्रवारी सकाळपासून पालिका अधिकारी व कर्मचारी या इमारतीमध्ये लोकांना बाहेर काढण्याचे काम करत होते. परंतु सायंकाळी अचानक इमारत कोसळली, यामध्ये दोन जण अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे बचाव कार्य सुरू आहे. तसेच आसपासच्या धोकादायक इमारती देखील खाली करण्यात आल्या आहेत.''

- डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, केडीएमसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: पावसाच्या सरींच्या साथीने अवघा वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल! दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर

Devendra Fadnavis: महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मंत्र्याला फडणवीसांचे भाजप प्रवेशाचे निमंत्रण

T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

Vidhan Sabha Election: महायुतीत कोणाला किती जागा? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

INDIA: अयोध्या जिंकणारा खासदार ठरणार जायन्ट किलर? लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी 'इंडिया'चा मोठा डाव

SCROLL FOR NEXT